शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Atiq Ashraf Murder: आरोपींनी मीडियाचे प्रशिक्षण अगोदरच घेतले होते! 'या'तिघांनी दिले होते ट्रेनिंग, पोलिसांनी घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 12:26 PM

1 / 9
Atiq Ashraf Murder: माफिया डॉन अतिक अहमदचा मारेकरी लवलेश तिवारीच्या कबुलीजबाबाच्या आधारे एसआयटीने त्याच्या तीन मित्रांना बांदा येथून ताब्यात घेतले आहे. हे तिघे लवलेशला मीडियाचे प्रशिक्षण देत होते, असा आरोप आहे.
2 / 9
Atiq Ashraf Murder: माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ या दोघांच्या हत्येतील मुख्य आरोपी लवलेश तिवारी अनेक दिवसांपासून मीडियाचे प्रशिक्षण घेत होता. पोलिसांच्या चौकशीत हा खुलासा झाल्यानंतर एसआयटीच्या पथकाने त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले आहे.
3 / 9
पकडले जाऊ नये म्हणून हे तीन मित्र त्याला मीडियापर्सन म्हणून कसे वागायचे हे शिकवत होते, असा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी या तिघांना बांदा येथून अटक करून प्रयागराज येथे आणले. या तिघांचीही येथे चौकशी सुरू आहे.
4 / 9
एसआयटीच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. आरोपीने पोलिसांच्या चौकशीत कबूल केले आहे की, त्याने या तीन मित्रांकडून मीडिया कर्मचाऱ्यांचे हावभाव आणि वर्तन करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. तो ही हत्या करण्यासाठी पत्रकाराच्या वेशात जाणार होता, असे आधीच नियोजन झाले होते.
5 / 9
कोणताही संशय येऊ नये म्हणून त्याने घटनेपूर्वी त्याच्या मित्रांकडून आवश्यक माहिती घेतली होती. आरोपी लवलेश तिवारीच्या या खुलाशानंतर, एका निरीक्षकाच्या नेतृत्वाखाली एसआयटी पथक बुधवारी रात्रीच बांदा येथे पोहोचले, जिथे तिन्ही आरोपींना रेल्वे स्थानकाजवळ ताब्यात घेण्यात आले. यावेळी आरोपींच्या माहितीच्या आधारे पोलिसांचे वेगवेगळे पथक हमीरपूर आणि कासगंजमध्ये पोहोचले आहेत.
6 / 9
हे दोन्ही पथक वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत आहेत. या घटनेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित लोकांच्या शोधात पोलीस या दोन्ही ठिकाणी छापे टाकत आहेत. शनिवारी लवलेश तिवारी, अरुण मौर्य आणि सनी यांनी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. १३ एप्रिल रोजी न्यायालयात आरोपी ही घटना घडवणार होते, मात्र त्यावेळी त्यांचा डाव सफल होऊ शकला नाही.
7 / 9
दरम्यान, १५ एप्रिल रोजी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी सुरू असताना त्याने हत्या करण्याचा कट रचला आणि त्यासाठी त्याच दिवशी रुग्णालयाच्या परिसरात फेऱ्याही मारल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पोलिसांच्या चौकशीत सांगितले की, ही घटना घडवण्यासाठी ते १२ एप्रिललाच प्रयागराज येथे आले होते. मात्र हत्या करण्यासाठी त्यांना तीन दिवस वाट पाहावी लागली.
8 / 9
दरम्यान, अतिक अहमद आणि अश्रफ अहमद यांना गोळ्या घालण्यात आल्या, तेव्हा रुग्णालयाबाहेर मीडिया कर्मचार्‍यांचा जमाव जमला होता. या सर्व प्रकारात तिघेही आरोपी लपून बसले आणि त्यांनी लगेच बाहेर येऊन अतिक आणि अश्रफ यांच्यावर गोळीबार केला. शूटर सनी याने पोलिसांना सांगितले की, तिघेही मरायला आले नाव्हते म्हणून त्यांनी आत्मसमर्पण केले आणि गोळीबार केल्यानंतर ते खूप घाबरले होते म्हणून त्यांनी 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या.
9 / 9
हत्येतील तिन्ही आरोपींची पोलिसांनी ८ तास चौकशी केली. यादरम्यान त्यांच्याकडून अनेक गुपिते उघड झाली. चौकशीदरम्यान लवलेश तिवारीने स्वतःला कट्टर हिंदूत्ववादी असल्याचे सांगितले. पोलीस रुग्णालयाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. तिघेही ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही घेण्यात येणार आहेत.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस