शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला CM; मुख्यमंत्री बनताच दरमहिना किती सॅलरी मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 12:46 PM

1 / 10
दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून अतिशी मार्लेना यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मंगळवारी आप आमदारांच्या बैठकीत अरविंद केजरीवालांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे केला त्यावर सर्वांनी एकमताने मंजुरी दिली आहे.
2 / 10
परदेशात शिकून आलेल्या नव्या मुख्यमंत्री अतिशी यांची संपत्ती पाहाल तर १ कोटीहून जास्त आहे. दिल्लीच्या कालाकाजी साऊथ मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली. माय नेता वेबसाईटनुसार, त्यांच्याकडे १.४१ कोटींची संपत्ती आहे. दिल्ली सरकारमधील कोट्यधीश मंत्री असून त्यांच्यावर कुठलेही कर्ज नाही.
3 / 10
२०१२ साली भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या अतिशी मार्लेना या आपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. २०१९ साली लोकसभा निवडणुकीत त्यांना पूर्व दिल्लीतून उभं करण्यात आले. मात्र भाजपाच्या गौतम गंभीर यांनी त्यांचा पराभव केला.
4 / 10
अतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून कामकाज सांभाळतील. याआधी सुषमा स्वराज आणि काँग्रेसकडून शीला दिक्षित या दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत. अरविंद केजरीवाल सरकारमध्ये अतिशी यांनी सर्वाधिक खाती सांभाळली आहेत.
5 / 10
सुषमा स्वराज या १९९८ साली दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री बनल्या. त्या केवळ ५२ दिवसांसाठी मुख्यमंत्री होत्या यानंतरच्या निवडणूक निकालात भाजपाचा पराभव झाला. तर १९९८ साली काँग्रेसनं निवडणूक जिंकून शीला दिक्षित यांना दिल्लीचे मुख्यमंत्री बनवलं.
6 / 10
अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासू सहकाऱ्यांमध्ये अतिशी यांचे नाव होते. जेव्हापासून केजरीवालांनी राजीनाम्याची घोषणा केली तेव्हापासून अतिशी यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. मात्र त्याला औपचारिकता बाकी होती. आज आपच्या बैठकीत अतिशी यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले.
7 / 10
दिल्लीच्या मुख्यमंत्री बनणाऱ्या अतिशी यांना आता किती सॅलरी मिळणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पगाराबाबत बोलायचे झाले तर विविध राज्यांमधील मुख्यमंत्र्यांना दिला जाणारा पगार हा त्या राज्यांवर अवलंबून असतो.
8 / 10
दिल्ली विधानसभेच्या वेबसाईटनुसार, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना दर महिना ३ लाख ९० हजार रुपये पगार दिला जातो. मुख्यमंत्र्यांचा वार्षिक पगार हा ४६.८० लाख इतका असतो. मुख्यमंत्र्यांना पगारासह इतर अन्य प्रकारचे भत्तेही दिले जातात.
9 / 10
दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागणार अशी चर्चा सुरू झालेली असताना अरविंद केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा करत सगळ्यांना धक्का दिला. दोन दिवसांत राजीनामा देणार, असे केजरीवाल म्हणाले होते त्यामुळे नवा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न सगळ्यांना पडला होता.
10 / 10
३० ऑगस्ट रोजी भाजपाच्या दिल्लीतील आमदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री तुरुंगात असल्याचा मुद्दा अधोरेखित भाजपा आमदारांनी दिल्लीतील सरकार बरखास्त करण्याची मागणी केली होती
टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीChief Ministerमुख्यमंत्री