शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PHOTOS : सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरील वाद आणखी चिघळला, लोकांनी घरात घुसून केली जाळपोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 7:25 PM

1 / 8
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सलमान खुर्शीद (Salman khurshid) यांनी नुकत्याच लिहिलेल्या 'सनराईज ओव्हर अयोध्या' या पुस्तकावरून वाद आणि विरोध आणखीनच चिघळत चालला आहे. त्यांनी पुस्तकात हिंदुत्वासंदर्भात लिहिल्यावरून सोमवारी नैनिताल येथे काही लोकांनी त्यांच्या घरावर जाळपोळ आणि दगडफेक केली. (Attack on Salman Khurshids house)
2 / 8
सलमान खुर्शीद यांनी स्वतः त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये घरावर हल्ला झाल्याचेही लिहिले आहे. एवढेच नाही तर, 'मला माझ्या मित्रांसाठी हे दरवाजे उघडण्याची आशा होती, ज्यांनी हे कॉलिंग कार्ड सोडले आहे,' असेही त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
3 / 8
त्यांनी त्यांच्या पुढच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, तर अता असा वाद आहे. लज्जा हा फारच अप्रभावी शब्द आहे. याशिवाय, मला अजूनही आशा आहे की, आपण एक दिवस एकत्रितपणे तर्क करू शकू.
4 / 8
नुकतेच काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी 'सनराईज ओव्हर अयोध्या' नावाचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकावरूनच राजकीय गदारोळ सुरू आहे. कारण सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या या पुस्तकात हिंदुत्वावर निशाणा साधला आहे. खुर्शीद यांच्या पुस्तकातील वादग्रस्त ओळींवर विश्व हिंदू परिषदेने नाराजी व्यक्त करत त्यांची जीभ कापण्याची धमकीही दिली होती.
5 / 8
सलमान खर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना आयएसआयएस आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केल्याने सत्ताधारी पक्ष भाजप आणि अन्य संघटना संतप्त आहेत. खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात हिंदुत्वाचे राजकारण धोकादायक असल्याचे म्हटले आहे.
6 / 8
खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे, हिंदुत्व सनातन आणि संतांचा प्राचीन हिंदू धर्माला बाजूला सारत आहे. जे, ISIS आणि बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक संघटनांसारखे आहे.
7 / 8
या पुस्तकावरून राजकीय गदारोळ झाल्यानंतर, सलमान खुर्शीद म्हणाले होते, मी कधीही हिंदुत्वाची तुलना दहशतवादी संघटनांशी केली नाही. तर त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की, भाजप समर्थक धर्माचा गैरवापर करतात, हे अगदी त्यांच्यासारखेच आहेत, जे इस्लामचा गैरवापर करतात.
8 / 8
खुर्शीद म्हणाले, की मी तर हिंदू धर्माचे कौतुक करत आहे. मला आक्षेप असायला हवा, की ते हिंदू धर्माचा गैरवापर करत आहेत. मात्र, त्यांच्या स्पष्टीकरणानंतरही अनेक हिंदू संघटना त्यांच्यावर निशाणा साधत आहेत.
टॅग्स :salman khurshidसलमान खुर्शिदcongressकाँग्रेसBJPभाजपाAyodhyaअयोध्या