ऑनलाइन लोकमतबंगळुरू, दि. 21 - औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर ट्रेनचे इंजिनसहीत तीन डबे घसरल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी कर्नाटकमधील काळगापूर आणि भालकी स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. केवळ काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनेनंतर प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. हैदराबादसाठी 04023200865, पारलीसाठी 02446223540, विक्राबादसाठी 08416252013 आणि बिदारसाठी 08482226329 या क्रमांकावर अधिक माहितीसाठी संपर्क केला जाऊ शकतो. काळगापूरजवळ मांजरा नदीवरील निझामकालीन पूल ओलांडल्यानंतर हा अपघात झाला आहे. मोटरमननं वेळीच रेल्वे थांबवल्याने हा मोठा अनर्थ टळला. दरम्यान, हा अपघात आहे की यामागे घातपाताचा कट होता, याची चौकशी सध्या सुरू आहे. दरम्यान, कर्नाटक प्रशासनानं बसद्वारे प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचवण्याचे काम केले. प्रवाशांच्या मदतीसाठी काळगापूर ग्रामस्थांनीही पुढाकार घेतला. दरम्यान, याच महिन्यात राणी एक्स्प्रेसचे 8 डबे उत्तर प्रदेशातील रामपूरजवळ रुळावरुन घसरले होते. तर गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशातच महाकौशल एक्स्प्रेस ट्रेन रुळावरुन घसरल्याची घटना घडली होती, ज्यात 50 प्रवासी जखमी झाले होते. Aurangabad- Hyderabad passenger train derailed between Khalgapur and Bhalki stations in Karnataka. No injuries or casualties reported pic.twitter.com/TFvuRrf5CE— ANI (@ANI_news) April 21, 2017