शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

30 वर्षांपूर्वी बनवली होती राम मंदिराची डिझाईन; जाणून घ्या कोण आहेत चंद्रकांत सोमपुरा?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 11:16 AM

1 / 9
अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले जात आहे. पहिला मजला तयार आहे. 22 जानेवारीला मंदिरात रामललांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. दरम्यान, अशा परिस्थितीत बार आणि सिमेंटशिवाय उभारल्या जाणाऱ्या या मंदिराची डिझाईन कोणी आणि केव्हा केली, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
2 / 9
आता हा प्रश्न उपस्थित झाला आहे, त्याचे उत्तर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. प्रभू रामाच्या या मंदिराची डिझाईन वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांनी 1990 साली केली होती. चंद्रकांत सोमपुरा हे खानदानी वास्तुविशारद आहेत. मंदिरांची डिझाईन करणारी त्यांची ही 15 वी पिढी आहे.
3 / 9
चंद्रकांत सोमपुरा आणि त्यांच्या कुटुंबाने यापूर्वी सोमनाथ मंदिर, मुंबईतील स्वामीनारायण मंदिर आणि कोलकाता येथील बिर्ला मंदिराची डिझाईन केली होती. आता चंद्रकांत सोमपुरा यांनी तयार केलेला अयोध्येच्या श्री राम मंदिराचा आराखडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
4 / 9
या डिझाईननुसार, प्रभू रामाचे हे मंदिर 161 फूट उंच आणि सुमारे 28,000 चौरस मीटर क्षेत्रात असणार आहे. चंद्रकांत सोमपुरा सांगतात की, त्यांनी 33 वर्षांपूर्वी विश्व हिंदू परिषदेचे माजी प्रमुख अशोक सिंघल यांच्या सांगण्यावरून राम मंदिराची डिझाईन तयार केली होती.
5 / 9
1990 मध्ये कुंभमेळ्याच्या वेळी चंद्रकांत सोमपुरा यांनी ही डिझाईन संतांसमोर मांडली आणि बरीच चर्चा झाल्यानंतर या डिझाईनला मंजुरी देण्यात आली होती. दरम्यानच्या काळात सुरू असलेल्या मंदिर-मशीद वादामुळे त्यावेळी या डिझाईनचे पुढील काम होऊ शकले नाही.
6 / 9
आता 2020 साली न्यायालयाच्या निर्णयानंतर या डिझाईनमध्ये किरकोळ बदल करून सध्याचे मंदिर उभारले जात आहे. वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांनी आतापर्यंत केवळ देशातच नव्हे तर जगभरातील 200 हून अधिक मंदिरांची डिझाईन केली आहे. यातील बहुतांश मंदिरेही बांधण्यात आली आहेत.
7 / 9
ज्यावेळी सोमनाथ मंदिर बांधण्यात आले. त्यावेळी चंद्रकांत सोमपुरा यांचे आजोबा प्रभाशंकर ओघडभाई यांनी सोमनाथ मंदिराची डिझाईन तयार केली होती, असे म्हटले जाते.
8 / 9
राम मंदिराची डिझाईन युनिक आहे. यामध्ये कुठेही लोखंड किंवा सिमेंटचा वापर केला जात नाही. बन्सी पहारपूरचा गुलाबी दगड आणि वाळूचा दगड राम मंदिरासाठी वापरण्यात आला आहे, असे चंद्रकांत सोमपुरा यांचे म्हणणे आहे.
9 / 9
तसेच, हे मंदिर हजारो वर्षे सुरक्षित राहील, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की बन्सी पहारपूरचा दगड जितका जुना होईल तितका तो मजबूत होईल. त्यामुळे मंदिर मजबूत करण्यासाठी स्टील वापरण्याची गरज नाही.
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश