शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राम मंदिराचे गर्भगृह तयार! सोन्याचा भव्य दरवाजा, महाराष्ट्राचे आहे खास कनेक्शन; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 12:36 PM

1 / 7
राम मंदिराच्या गर्भगृहाच्या सुवर्ण दरवाजाचे फोटो समोर आले आहेत. समोर आलेल्या फोटोमध्ये मंदिराच्या परिसरात प्रकाश दिसत आहे. त्यामुळे मंदिराचे दृश्य विलोभनीय दिसते.
2 / 7
या दरवाजाची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. असे सुमारे १४ सोन्याचे दरवाजे बसवण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे. रामललाच्या गर्भगृहात बसवलेल्या सोन्याच्या दरवाजावर सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे.
3 / 7
राम मंदिराचे १४ सुंदर दरवाजे महाराष्ट्रातील सागवानापासून बनवलेले असून त्यावर सोन्याने मढवलेले आहेत. हे सोन्याचे दरवाजे हैदराबाद येथील कंपनीच्या कारागिरांनी तयार केले आहेत.
4 / 7
दारांवर भव्यतेचे प्रतीक, गज, सुंदर विष्णू कमळ, स्वागताच्या मुद्रेतील देवी चित्रित केल्या आहेत. सोनेरी दरवाजा सुमारे १२ फूट उंच आणि ८ फूट रुंद आहे.
5 / 7
राम लला यांचा अभिषेक २२ जानेवारीला होणार आहे. गर्भगृहात फक्त १ दरवाजा असेल. त्याच्या दाराच्या चौकटीवर भगवान विष्णूचे निद्रावस्थेतील चित्र कोरलेले आहे. राम मंदिरात एकूण ४६ दरवाजे बसवले जाणार आहेत. यापैकी ४२ वर १०० किलो सोन्याने लेपित असतील.
6 / 7
२२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार असून, या दिवशी सुमारे १०० ठिकाणी पूजा, सांस्कृतिक कार्यक्रम व लोकनृत्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या दिवशी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे.
7 / 7
२२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील व्हिआयपींना निमंत्रण देण्यात आले आहे.
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या