Badrinath Temple covered in a sheet of snow due to heavy snowfall in the town
बद्रिनाथ मंदिरावर पसरली बर्फाची चादर! By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 4:38 PM1 / 7महाराष्ट्रात अद्याप थंडीची लाट पसरली नाही. मात्र देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट जाणवू लागली आहे.2 / 7अनेक ठिकाणचा पारा उतरण्यास सुरुवात झाली असून उत्तराखंडमध्ये शून्य अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. 3 / 7तापमानाचा पारा खाली आल्यामुळे या भागात बर्फवृष्टी झाल्याचंही पाहायला मिळत असून याठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. 4 / 7मुख्य म्हणजे येथील बद्रिनाथ मंदिर आणि परिसरात बर्फाची पांढरी चादर पसरली आहे.5 / 7याठिकाणी जरी बर्फवृष्टीमुळे थंडी वाढली असली तरी यामुळे मंदिरांच्या दिशेने येणाऱ्या भाविकांचा उत्साह कायम असल्याचे दिसून येते.6 / 7याचबरोबर, केदारनाथ धामच्या सभोवतालच्या उंच मैदानात सफेद बर्फाची चादर पसरलेली आहे.7 / 7त्यामुळे केदारनाथ धाममध्ये थंडी वाढली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications