शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Bakri Eid : ये तेरा वतन, ये मेरा वतन... सीमारेषेवर बकरी ईदच्या मिठाईचा गोडवा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 3:44 PM

1 / 10
देशभरात आज ईद-उल-अझा अर्थात बकरी ईद साजरी होत आहे. कोविडच्या साथीमुळं बहुतांश ठिकाणच्या ईदगाह मैदानांवर किंवा मशिदींमध्ये आज सामुहिक प्रार्थना होणार नाही.
2 / 10
सर्वांनी कोविड प्रतिबंधाचे नियम पाळूनच हा सण साजरा करावा असं आवाहन अनेक धार्मिक नेत्यांनी तसंच धार्मिक अभ्यासकांनी केलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी ईद-उल-अजहा निमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
3 / 10
ईद-उल-अजहा हा प्रेम, निस्वार्थी वृत्ती आणि त्यागाची भावना व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा सण असून समावेशक समाजात एकात्मता आणि बंधुभाव निर्माण करण्याचं काम करतो, असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
4 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देशवासियांना बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या असून देशभरात हिंदू बांधव मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देत आहेत. देशात कोरोनाच्या सावटात यंदाही सण साजरा होत आहे.
5 / 10
इस्लामिक कॅलेंडरनुसार रमजान ईदनंतर दोन महिन्यांनी बकरी ईद येते, यावेळी बकऱ्याची कुर्बानी दिली जाते, म्हणून कुर्बानी दिवसही म्हटले जाते.
6 / 10
देशाच्या सीमारेषांवरही दोन्ही देशांच्या सैन्यांकडून मिठाई वाटून बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. राजस्थानच्या बीएसएफ जवान आणि पाकिस्तानी रेंजर्संमध्ये ईदचा गोडवा दिसून आला.
7 / 10
देशाच्या सीमारेषांवर रजमान ईद आणि बकरी ईददिनी दोन्ही देशांतील सैन्यांमध्ये मिठाईचे वाटप होते. मात्र, गेल्यावर्षी ही मिठाई वाटण्यात आली नव्हती.
8 / 10
गतवर्षी दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधामुळे ईदच्या सणाला गोडवा दिसून आला नव्हता. पण, यंदा पुन्हा एकदा सैन्यांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला आहे.
9 / 10
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील तणाव अधिक वाढला आहे. त्यामुळेच, मिठाईचे आदान-प्रदान करण्यास गतवर्षी परवानगी देण्यात आली नव्हती.
10 / 10
दिवाळी, गणतंत्र दिवस, स्वातंत्र्य दिन, होळी यांसारख्या सणादिवशी दोन्ही देशांमधील सैन्यांकडून मिठाई वाटून सेलिब्रेशन करण्यात येत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे सेलिब्रेशन कधी-कधी खंडीत झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
टॅग्स :Bakri Eidबकरी ईदBorderसीमारेषाBSFसीमा सुरक्षा दलPakistanपाकिस्तान