शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बाटलीबंद पाणी पित असाल तर सावधान! एक लीटर पाण्यात प्लॅस्टिकचे अडीच लाख तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 3:37 PM

1 / 5
बाटलीबंद पाण्याविषयी नवीन अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका लीटर बाटलीबंद पाण्यात प्लास्टिकचे तब्बल अडीच लाख तुकडे असतात, असं या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.
2 / 5
मायक्रोप्लास्टिक हे एक मायक्रोमीटर म्हणजेच एक मीटरच्या १० लाखाव्या हिस्स्याच्या आकाराचे असू शकते. नॅनोप्लॅस्टिक मायक्रोमीटरपेक्षाही लहान असते. कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासकांनी अमेरिकेत विक्रीस असणाऱ्या लोकप्रिय कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्याविषयी अभ्यास केल्यानंतर हे पाणी आरोग्यास अपायकारक असल्याचे समोर आले.
3 / 5
प्रत्येक बाटलीबंद पाण्यात १०० नॅनोमीटरचे प्लॅस्टिकचे तुकडे असल्याचं या अभ्यासात आढळून आलं. याबाबतची माहिती प्रोसीडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी आणि सायन्सेस जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे.
4 / 5
दरम्यान, गेल्या काही वर्षांत करण्यात आलेल्या विविध संस्थांच्या अभ्यासात फक्त पिण्याचं पाणीच नव्हे तर माती, जेवणातही प्लॅस्टिक उपलब्ध असल्याचं आढळून आलं आहे.
5 / 5
प्लॅस्टिक शरीरात गेल्याने आरोग्याला होणारा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे बाटलीबंद पाणी पिण्याआधी आता ग्राहकांना हजारदा विचार करावा लागणार आहे.
टॅग्स :Waterपाणी