By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 10:15 IST
1 / 5राजधानी दिल्लीमध्ये आधारकार्डच्या आधारे लोकांना लुबाडण्याचा प्रकार समोर आलाय, एका युवकाच्या आधारकार्डवर बनावट फोटो लावून त्याच्या क्रेडिट कार्डमधून 1 लाख रुपये लुटण्यात आलेत. 2 / 5पिडीत युवकाने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 मार्च रोजी त्यांच्या मोबाईलवर ओटीपी पासवर्ड आला. मात्र त्यानंतर काही वेळातच क्रेडिट कार्डमधून 1 लाख रुपये काढल्याचा मॅसेजदेखील आला3 / 5पिडीत नरेंद्रने याबाबत मोबाईल कंपनीला तक्रार केली त्यावेळी त्यांना माहिती पडले त्यांच्या ड्युएल सिममधील एक मोबाईल नंबर सेवा बंद झाली आहे. ग्राहक सेवा अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आपण ड्युप्लिकेट सीमकार्ड जारी केल्याचे नरेंद्रला सांगितले. 4 / 5मात्र आपण कार्ड घेतलं नसून मोबाईल कंपनीकडे पुरावा मागितला तर नरेंद्र आधारकार्ड खरे होते मात्र त्यावर बनावट फोटो लावला असल्याने नरेंद्रला धक्का बसला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे नरेद्रला कळाले, त्यानंतर त्याने पोलीस स्टेशनला तक्रार केली. 5 / 5पोलिसांनी चौकशी केल्यानंतर नरेंद्रच्या आधारकार्डवर ज्याचा फोटो आहे त्याच शोध घेतला गेला. पोलिसांनी मोहम्मद कासिम या आरोपीला पकडलं आहे. त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.