शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Omicron Variant : "कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहा," ओमायक्रॉन परिस्थितीवर एम्स प्रमुखांचा सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 8:15 AM

1 / 10
Omicron Variant : सध्या अनेक ठिकाणी ओमायक्रॉनचे रुग्ण सापडताना दिसत आहे. भारतातही ओमायक्रॉन विषाणूचा शिरकाव झालाय. दरम्यान आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहावं लागेल, असं मत एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया (AIIMS Chief Dr. Randeep Guleria) यांनी व्यक्त केलं.
2 / 10
देशात सापडत असलेल्या ओमायक्रटॉमन व्हेरिअंटसह कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येदरम्यान गुलेरिया यांनी हा इशारा दिला. भारतात आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरिअंटचे १५० पेक्षा अधिक रुग्ण दिसून आले होते. कोरोनाचा हा विषाणू अधिक संसर्गजन्य असल्याचं म्हटलं जातंय. जगभरात या व्हेरिअंटचे हजारो रुग्ण समोर येत आहेत.
3 / 10
ब्रिटनमध्ये, रविवारी, ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या सुमारे दहा हजार केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. ब्रिटनमधील वाढत्या केसेसचा संदर्भ देत गुलेरिया म्हणाले की, आम्हाला कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहावे लागेल. ब्रिटनमध्ये दररोज सुमारे एक लाख प्रकरणे समोर येत आहेत. 'आम्हाला ओमिक्रॉनचा अधिक डेटा हवा आहे,' असंही गुलेरिया म्हणाले.
4 / 10
अमेरिका, ब्रिटन आणि इतर देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या आलेखावर आपण लक्ष ठेवले पाहिजे. अशा कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण स्वतःला आधीच तयार करणे हे एक शहाणपणाचे पाऊल असेल. ओमायक्रॉन जगात प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळून आला असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटल्याचं त्यांनी नमूद केलं.
5 / 10
९ नोव्हेंबर रोजी पहिल्यांना या व्हेरिअंटचा (B.1.1.529 ) नमूना तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी याची पुष्टी झाली. जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हेरिअंटला (B.1.1.529 ) नाव दिलं. त्यानंतर ओमायक्रॉनला व्हेरिअंट ऑफ कन्सर्न देण्यात आलं.
6 / 10
कोरोनाचा एकामागोमाग एक व्हेरिअंट समोर येत आहेत. ओमायक्रॉन तर डेल्टापेक्षा ७० पटींनी पसरणारा आहे. हा कोरोना व्हायरस हवेतून कसा पसरतो यावर यूनिवर्सिटी कॉलेज लंडनचे पर्यावरण इंजिनिअरिंग असोसिएट प्रोफेसर लीना सिरिक, यूनिवर्सिटी ऑफ शेफील्ड वरिष्ठ लेक्चरर अबीगैल हैथवे आणि यूनिवर्सिटी ऑफ नॉटिंघमचे आर्किटेक्चर अँड बिल्ट एन्वायरमेंट डिपार्टमेंटचे प्रोफेसर बेंजामिन जोन्स यांनी संशोधन केलं आहे.
7 / 10
जगभरातील लोकांना आता मास्क घालून फिरणे सामान्य वाटू लागले आहे. आम्ही मास्क परिणामकारक आहे की नाही यावर अभ्यास करत आहोत. कोरोना व्हायरस हवेद्वारे कसा पसरतो, हे आम्हाला समजून घ्यायचे आहे. यामुळे कोरोनाच्या संक्रमणाला रोखले जाऊ शकेल. मास्क हवेतून निघालेले कण नियंत्रित करू शकतो का हे आम्हाला शोधायचे असल्याचे या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
8 / 10
जेव्हा आपण बोलतो, खोकतो किंवा श्वास घेतो तेव्हा आपल्या तोंड आणि नाकाद्वारे हवा बाहेर पडते. यावेळी फुफ्फुस, गळा आणि तोंडातून श्वसन तरंगणारे कण एकत्र करते आणि त्याव्दारे या हवेतील थेंबांचे निर्माण होते. हे थेंब हवेत सोडले जातात. खोकणे किंवा बोलण्यासाठी जी शक्ती खर्ची पडते त्यातून हे कण तयार होतात, असंही त्यांनी नमूद केलं.
9 / 10
बहुतांश कण हे पाच मायक्रॉनपेक्षाही कमी असतात, ज्याला आपण एअरोसोल म्हणतो. यापेक्षा मोठा थेंब हा १०० मायक्रॉन एवढा मोठा असू शकतो. हे एअरोसोल तासंतास हवेत तरंगत असतात आणि ते संसर्ग पसरवू शकतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
10 / 10
लोकांमधील व्हायरल लोडच्या भिन्नतेमुळे मास्कचे फायदे अचूक मोजणे कठीण आहे, असं या तज्ज्ञांनी म्हटलं आहे. मास्क वापरणाऱ्या संक्रमित व्यक्तीद्वारे हवेत सोडल्या जाणाऱ्या व्हायरसचे प्रमाण कमी होते. मात्र, मास्कची किती मदत मिळते हे तो व्यक्ती किती प्रमाणात व्हायरस सोडतो त्यावर अवलंबून आहे, असंही या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
टॅग्स :AIIMS hospitalएम्स रुग्णालयOmicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या