शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आत्मनिर्भर बनिये... स्टेडियमच्या नामांतरावरुन मिम्स, ट्विटरवर मोदी ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 6:03 PM

1 / 13
जगातील सर्वात मोठं स्टेडियम असा लौकिक मिळवणाऱ्या या स्टेडियमचे औपचारिक उदघाटन आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते.
2 / 13
या स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना आजपासून खेळवण्यात येत आहे. मात्र, स्टेडियमच्या नामांतरावरुन विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केलीय.
3 / 13
सोशल मीडियावरुन याबाबत मिम्स तयार होत असून ट्विटरवरही नरेंद्र मोदी स्टेडियम ट्रेंड करत आहे. काहींनी मोदींच्या नामांतरावरुन आत्मनिर्भर स्टेडियम असं ट्विट केलंय.
4 / 13
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असून भारतीय संघानं सामन्यात चांगली सुरुवात देखील केली आहे.
5 / 13
पहिल्या सत्रानंतरच्या 'क्रिकेट लाइव्ह' कार्यक्रमात बोलताना भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी अहमदाबादमधल्या या नव्या स्टेडियमबाबत बोलताना एक अजब दावा केला आहे.
6 / 13
'देशात क्रिकेटचे सर्वाधिक चाहते हे गुजरातमध्ये आहेत', असं वक्तव्य सुनील गावस्कर यांनी केलंय. गुजरातच्या अहमदनगरमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर आज पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होत आहे.
7 / 13
मोटेरा स्टेडियमच्या नामांतरावरुन मोदी समर्थक आणि मोदी विरोधक आपापसात भिडले आहेत, पद्मावत चित्रपटातील हा डायलॉग आहे
8 / 13
ट्विटरवर नरेंद्र मोदी स्टेडियम आणि सरदार पटेल का अवमान हे दोन हॅशटॅग ट्रेंड करत आहेत.
9 / 13
काजोलचे हे छायाचित्र नेहमीच ट्रेंडींगमध्येअसते
10 / 13
मोदींनी जणू राहुल गांधींनाच विचारलं, कसं वाटतंय माझं सरप्राईज
11 / 13
मोदींनी काँग्रेसवर केलेल्या टीकेची आठवण करुन देताना, या नामांतराची खिल्ल उडविण्यात आली आहे.
12 / 13
सरदार वल्लभभाई पटेल यांनी आरएसएसबद्दल काय विधान केले होते, तेही पुन्हा चर्चेत आले आहे.
13 / 13
मोदींच्या आत्मनिर्भर भारत योजनेतूनच हे नामांतरण झाल्याचं मिम्स करण्यात आलंय.
टॅग्स :Narendra Modi Stadiumनरेंद्र मोदी स्टेडियमNarendra Modiनरेंद्र मोदीTwitterट्विटर