Beating Retreat 2020: ... Beating Retreat Ceremony is 'Exclusive'
Beating Retreat 2020: ...म्हणून बीटिंग रिट्रीट सोहळा आहे 'खास' By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 10:40 PM1 / 8देशाच्या राजधानीत प्रजासत्ताक दिनानंतर 29 जानेवारीला बीटिंग द रिट्रीटचं कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. रायसिना रोडवर राष्ट्रपती भवनासमोर याचं प्रदर्शन केलं जातं. 2 / 8चार दिवस चालणाऱ्या प्रजासत्ताक दिनाची सांगता बीटिंग द रिट्रीटनं होते. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात Beating Retreatचा कार्यक्रम पाहण्यासारखा असतो. 3 / 8लष्कराच्या सर्वच तुकड्यांनी यावेळी संचलन केलं आहे. राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि इतर सरकारी इमारतींना विद्युत रोषणाई करण्यात आली होती. 4 / 8बीटिंग रिट्रीटदरम्यान रायसीना हिलला तिरंग्यांच्या रोषणाईनं झगमगून टाकलं होतं. बीटिंग रिट्रीट सोहळ्यासाठी विजय चौकमध्ये सामान्य नागरिकांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला होता. 5 / 8बीटिंग रिट्रीट सोहळ्यासाठी अनेक मार्गांमध्ये बदल करण्यात आला होता, तर काही मार्ग बंद ठेवण्यात आले होते. दिल्ली पोलिसांनीही रस्त्यांसंदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी केली होती. 6 / 8कोणकोणते रस्ते बंद आहेत आणि कोणत्या रस्त्यांवरून वाहतूक वळवली आहे, याची माहिती पोलिसांकडून सामान्य नागरिकांना देण्यात आली होती. 7 / 8विजय चौकात पारंपरिक संगीतानं तिन्ही सेनांनी संचलन केलं आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम माथुर उपस्थित होते. 8 / 8Beating Retreat कार्यक्रमात सेनेचे बँड मार्च परत जात असताना 'सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा...' हे संगीत लावलं जातं. यावेळी उपस्थितांनी झेंड्याला वंदनही केलं. आणखी वाचा Subscribe to Notifications