Before 2024, the roads of the country will be made like America Says Nitin Gadkari
Nitin Gadkari: नितीन गडकरींनी मांडला '२०२४ चा रोडमॅप'; संसदेत बाकं वाजवून खासदारांनी केले कौतुक By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 6:07 PM1 / 10केंद्रीय रस्ते व महामार्ग निर्माण मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी संसदेत देशाच्या रस्त्यांचा रोडमॅप समोर ठेवला. येत्या २०२४ पर्यंत देशाचे रस्ते अमेरिकेसारखे करण्यात येतील. यावर्षी डिसेंबरपर्यंत दिल्लीपासून अनेक शहरं २ तासांच्या अंतरावर असतील. 2 / 10त्याचसोबत श्रीनगर ते मुंबई हे अंतर २० तासांत पार करता येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोदी सरकारच्या काळात देशभरात रस्त्यांचे जाळे विणले. विविध महामार्ग, उड्डाणपूल बांधले. संसदेत गडकरींनी नेमकं काय काय सांगितले ते जाणून घेऊया. 3 / 10गडकरी म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन कॅनडी यांचे एक वाक्य मी नेहमी लक्षात ठेवतो. अमेरिकेचे रस्ते यासाठी चांगले नाहीत कारण अमेरिका हा श्रीमंत देश आहे. तर अमेरिका श्रीमंत आहे कारण त्याठिकाणचे रस्ते खूप चांगले आहेत. 4 / 10२०२४ संपण्यापूर्वी भारतातील रस्त्यांच्या विकासाचा महामार्ग हा अमेरिकेच्या बरोबरीचा असेल. हा विश्वास मी सदनाला देतो. केवळ जम्मू काश्मीर इथे जवळपास ६० हजार कोटींचे काम सुरू आहे. जोजीला टनलवर १ हजार लोकं शून्य डिग्री तापमानात काम करतायेत असं गडकरींनी सांगितले. 5 / 10२०२६ पर्यंत होणाऱ्या कामाला २०२४ पर्यंतचं टार्गेट देण्यात आले आहे. मनाली इथं अटल बोगदा बनवण्यात आला आहे. सुरूवातीला साडे तीन तास प्रवास करायला लागत होता आता केवळ ८ मिनिटांत प्रवास होत आहे. लडाख लेहहून थेट कारगील, कारगील ते झेरमर आणि झेरमरहून श्रीनगर मोठे महामार्ग बनत आहेत. 6 / 10आम्ही ५ बोगदे बनवत आहोत. हे वर्ष संपेपर्यंत श्रीनगरहून मुंबईला केवळ २० तासांत पोहचता येईल. यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत दिल्लीपासून अनेक शहरं २ तासांच्या अंतरावर येतील. त्याची यादीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी संसदेत मांडली. 7 / 10दिल्ली-जयपूर, दिल्ली-हरिद्वार, दिल्ली-देहरादून ही शहरं २ तास दिल्ली-अमृतसर ४ तास तर दिल्ली-मुंबई १२ तास यावर्षीच्या अखेरपर्यंत शक्य आहे. दक्षिणेकडेही कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चेन्नई ते बंगळुरू अंतरही २ तासांचे होईल. रस्त्यांच्या विकासाची यादी मोठी आहे.8 / 10या भाषणात गडकरींनी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांचा किस्सा सांगितला. मी सोनोवाल यांच्या प्रचारासाठी गेलो होतो. हेलिकॉप्टरमध्ये त्यांनी माझा हात दाबला अन् म्हणाले तुम्ही केवळ सांगा. तेव्हा खर्च किती असेल मला माहिती नाही असं मी म्हटलं. पण मला इमोशनल केले. मी माजुलीच्या सभेत उड्डाणपूल बांधून देऊ असं घोषित केले. 9 / 10या सभेनंतर दिल्लीत आलो तेव्हा अधिकाऱ्यांनी मला तो पूल बांधण्याची किंमत किती आहे हे माहिती आहे का असं विचारलं तेव्हा मी म्हटलं किती. तेव्हा ते म्हणाले ६ हजार कोटी. मी एकदम थक्क झालो. ६ हजार कोटी एका पुलाला देणार कसे? परंतु यामुळे मला सिंगापूर, मलेशियाचं तंत्रज्ञान कळले. आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत ६ हजार कोटींचा पूल ६८० कोटींमध्ये बनवायला दिला. 10 / 10त्याचसोबत मंत्रालयाने रोज ३८ किलोमीटर महामार्ग बांधणीच्या विक्रमासह आधीच ४ विक्रम स्थापन केलेले आहेत, आता आम्हाला रोज ५० किलोमीटर महामार्ग बांधणी करण्याची इच्छा आहे असा विश्वासही नितीन गडकरींनी संसदेत व्यक्त केला. आणखी वाचा Subscribe to Notifications