By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 15:35 IST
1 / 8राहुल गांधी यांनी आज काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं स्विकारली असून काँग्रेसच्या 'राहुलपर्वा'ला सुरुवात झाली आहे.2 / 8काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी राहुल गांधींना अध्यक्षपदाचं प्रमाणपत्र देत, सूत्रं सोपवली. 3 / 8काँग्रेस कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच मुख्यालयाबाहेर जय्यत तयारी सुरु केली होती. 4 / 8सलग 19 वर्ष पक्षाचं नेतृत्व करत अध्यक्षपद सांभाळणा-या सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवण्याचा निर्णय घेतला.5 / 8राहुल गांधी हे नेहरू-गांधी कुटुंबातून आलेले काँग्रेसचे सहावे अध्यक्ष आहेत. काँग्रेसच्या इतिहासात सोनिया गांधी याच सर्वाधिक काळ सलग 19 वर्ष पक्षाध्यक्ष राहिल्या आहेत. 6 / 8प्रियांका गांधीही यावेळी उपस्थित होत्या7 / 8यावेळी माजी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते.8 / 8काँग्रेस पक्षाला 'ग्रँड ओल्ड पार्टी' म्हटलं जातं. मात्र आगामी काळात काँग्रेसला 'ग्रँड ओल्ड अँड यंग पार्टी' बनवणार आहे. त्यासाठी तरुणांनो, एकत्र या, आपण एकतेचं आणि प्रेमाचं राजकारण करु', असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.