शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एक दिवसाआड आंघोळ, डिस्पोजेबल भांड्यात जेवण; पाणीटंचाईने बंगळुरूतील लोकांचे प्रचंड हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 11:41 AM

1 / 9
बंगळुरूतील जलसंकटामुळे लोकांचं जगणं कठीण झालं आहे. पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी तिथले लोक घरून काम करणं, एक दिवसाआड आंघोळ करणं, आठवड्यातून दोनदा बाहेरून जेवण मागवणं, डिस्पोजेबल भांडी वापरणं असे विविध प्रयोग करत आहेत.
2 / 9
बंगळुरूच्या लोकांसाठी, विशेषत: व्हाईटफिल्ड, केआर पुरम, इलेक्ट्रॉनिक सिटी, आरआर नगर, केंगेरी आणि सीव्ही रमण नगर येथे राहणाऱ्या लोकांसाठी पाणीटंचाई ही एक गंभीर बाब बनली आहे.
3 / 9
पाणी साठवण सुविधांनी सुसज्ज असलेल्या मोठ्या अपार्टमेंटमध्ये राहणारे लोकही आता पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले आहेत. बंगळुरूमधील रेस्टॉरंट्स पाण्याचा जास्त वापर टाळण्यासाठी डिस्पोजेबल कप, ग्लास आणि प्लेट्स वापरण्याचा विचार करत आहेत.
4 / 9
पाण्याची टंचाई लक्षात घेता अनेक शाळा आणि इमारत संघटनांनी 'पाऊस नाही, पाणी नाही', 'सर्वत्र पाणी आहे पण प्यायला एक थेंबही नाही', 'पाणी वाचवा' इत्यादी पोस्टर लावून आपली मतं मांडली आहेत. पाणीटंचाईमुळे शहरातील एका कोचिंग सेंटरने नुकतेच आपल्या विद्यार्थ्यांना आठवडाभर ऑनलाइन क्लासेसद्वारे अभ्यास करण्यास सांगितले आहे.
5 / 9
बन्नेरघट्टा रोडवरील शाळाही बंद ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास करण्यास सांगितलं आहे. केआर पुरममध्ये राहणारे काही लोक एक दिवसाआड आंघोळ करत आहेत. घरी स्वयंपाक करण्याऐवजी ते आठवड्यातून दोनदा जेवणाची ऑर्डर देत असून भाडेकरूंच्या पाणी वापरावर विविध निर्बंध लादण्यात आले आहेत.
6 / 9
शासनाने दर निश्चित करूनही टँकरच्या पाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. केआर पुरम येथील रहिवासी असलेल्या सुजाता म्हणाल्या की, तापमान वाढत असल्याने रोज आंघोळ केल्याशिवाय राहू शकत नाही, पण एक दिवसाआड आंघोळ करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरला नाही.
7 / 9
आम्ही काय करू? माझी दोन शाळेत जाणारी मुलं आहेत आणि आम्हाला घरची कामंही करावी लागतात. भांडी स्वच्छ करा, अन्न शिजवा, कपडे धुवा…म्हणून, आम्ही कागदी प्लेट वापरण्यास सुरुवात केली आहे, अशा प्रकारे आम्ही आमचा पाण्याचा वापर कमी केला आहे आणि आम्ही आठवड्यातून दोनदा अन्न ऑर्डर करतो असं सांगितलं आहे.
8 / 9
शहरातील सुमारे 50 टक्के बोअरवेल कोरड्या पडलेल्या भूजल स्रोतांची पूर्तता करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी कोरड्या जलाशयांमध्ये दररोज 1,30 कोटी लिटर प्रक्रिया केलेल्या पाण्याने भरण्याचा निर्णय घेतला आहे.
9 / 9
बंगळुरूमधील या भीषण जलसंकटाचे कारण गेल्या वर्षी कमी पाऊस असल्याचं सांगितलं जात आहे. केंगेरी येथील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या शोभा म्हणाल्या, आमच्या अपार्टमेंटमध्ये पावसाचे पाणी साठवण्याची सोय आहे, पण गेल्या वर्षी पाऊस कमी झाला त्यामुळे सोय असूनही आम्हाला पाणी साठवता आले नाही. आता बिल्डिंग असोसिएशनने पाणी काटकसरीने वापरण्यास सांगितले आहे. (फोटो - zeenews)
टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात