1 / 7पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पुन्हा एकदा लग्नबेडीत अडकणार आहेत. मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडल्यानंतर आता ते अत्यंत खासगी कार्यक्रमात लग्नबेडीत अडकणार आहेत. त्यांचे लग्न उद्या, गुरुवारी चंदीगढमध्ये होणार आहे. 2 / 7भगवंत मान हे डॉ गुरप्रीत कौर हिच्याशी लग्न करणार आहेत. या लग्नसोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील उपस्थित राहणार आहेत. 3 / 7भगवंत मान हे ४८ वर्षांचे आहेत. त्यांचे हे दुसरे लग्न आहे. पहिली पत्नी इंदरप्रीत कौर हिच्याशी त्यांचा घटस्फोट झालेला आहे. या दोघांना दोन मुले आहेत. ही मुले इंदरप्रीत यांच्यासोबत अमेरिकेत असतात. 4 / 7कॉमेडिअन ते राजकीय हस्ती बनलेले भगवंत मान हे २०१४ मध्ये पहिल्यांदा संगरूरहून खासदार झाले होते. तेव्हा त्यांची पहिली पत्नी इंदरप्रीत ही त्यांच्या प्रचारामध्ये सक्रीय होती. मात्र, २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर २०१९ मध्ये मान यांनी पुन्हा लोकसभा गाठली. 5 / 7२०२२ मध्ये ते पंजाबचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वात पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले. १६ मार्चला मान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजकारणामुळे कुटुंबाला वेळ देता येत नसल्याचे भगवंत मान म्हणाले होते. 6 / 7भगवंत मान यांच्या पत्नीबद्दल सांगितले जात आहे की ती त्यांच्या कुटुंबाच्या जवळची आहे. भगवंत मान आणि त्यांची भावी पत्नी एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. भगवंत मान यांच्या आईलाही मुलगी पसंत आहे.7 / 7भगवंत मान यांच्या लग्नाच्या तयारीची जबाबदारी आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राघव चढ्ढा यांच्यावर आहे. राघव चढ्ढा स्वतः सर्व तयारी करत आहेत. हा कार्यक्रम अतिशय गुप्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाची कोणालाच माहिती नव्हती.