Bhangarwala also bought 6 Air Force helicopters and sold 3 at the same price
भंगारवाल्याने एवढ्या किंमतीत घेतले वायू दलाचे 6 हेलिकॉप्टर, लगेच 3 विकलेही By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 6:30 PM1 / 10पंजाबच्या मानसामध्ये वास्तव्यास असलेल्या एका भंगारवाल्यानं भारतीय हवाई दलाची ६ हेलिकॉप्टर ऑनलाईन लिलावातून विकत घेतली आहेत. 2 / 10या प्रत्येक हेलिकॉप्टरचं वजन १० टन असून बोलीच्या माध्यमातून भंगारवाल्यानं हेलिकॉप्टरची खरेदी केली आहे. भंगारवाल्यानं एकूण ६ हेलिकॉप्टर खरेदी केली होती. 3 / 10त्यापैकी एक मुंबईतील एका व्यक्तीनं खरेदी केलं. तर दोन हेलिकॉप्टर लुधिनायातील एका हॉटेल व्यवसायिकानं खरेदी केली. आता उर्वरित तीन हेलिकॉप्टर मानसामध्ये उभी आहेत.4 / 10मात्र, आपल्याकडी आणखी 2 हेलिकॉप्टर विकून केवळ एक हेलिकॉप्टर आपल्याकडे संग्रहीत म्हणून ठेवण्याचा मानस मिठ्ठू यांनी बोलून दाखवला आहे. 5 / 10मानसामध्ये उभी असलेली तीन हेलिकॉप्टर सध्या स्थानिकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहेत. पंजाबमध्ये मिठ्ठू भंगारवाल्याचं नाव प्रसिद्ध आहे. 6 / 10मिठ्ठू यांनी लिलावात 72 लाख रुपयांना हे 6 हेलिकॉप्टर खरेदी केली आहेत. त्यापैकी तीन हेलिकॉप्टर त्यांनी 12 ते 15 लाख प्रत्येकी अशा किंमतीत विकले आहेत. 7 / 10पंजाबमधील त्यांच्या मानसा येथील त्यांच्या 6 एकर जमिनीवर तीन हेलिकॉप्टर त्यांनी आणून ठेवले आहेत. विशेष म्हणजे एक हेलिकॉप्टर इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना 75 हजार रुपयांचा खर्च आला आहे. 8 / 10सध्या तीन हेलिकॉप्टर्स मानसामध्ये उभी आहेत. ही हेलिकॉप्टर्स पाहायला लोकांची गर्दी होत आहे. अनेक जण इथे येऊन हेलिकॉप्टरचे फोटो आणि सेल्फी काढत आहेत.9 / 10मानसा शहरातील कित्येक जण येऊन हेलिकॉप्टरमध्ये बसत आहेत, त्याच्या शेजारी येऊन उभे राहत आहेत. हवाई दलाच्या सेवेत असलेल्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढण्याची खूप कमी जणांना मिळते. 10 / 10त्यामुळेच हवाई दलानं वापरलेल्या, सेवेतून निवृत्त झालेल्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढण्याची संधी अनेक जण साधत आहेत. त्याबद्दल भंगारवाल्यानं आनंद व्यक्त केला. आणखी वाचा Subscribe to Notifications