शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोदींच्या फॅन अन् फायरब्रँड नेतृत्त्व...पटेलांच्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला भानुबेन बाबरिया! कोण आहेत जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 3:44 PM

1 / 8
भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. गांधीनगर येथील नवीन सचिवालयाच्या हेलिपॅड मैदानावर शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पटेल यांना गुजरात राज्याचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ दिली. एकूण १८२ जागांपैकी भाजपने विक्रमी १५६ जागा जिंकल्या आहेत.
2 / 8
भानुबेन या पदवीधर आहेत. यापूर्वी २००७ आणि २०१२ मध्येही त्यांनी निवडणूक जिंकली होती. त्यांची ही आमदारकीची तिसरी टर्म आहे.
3 / 8
२०१७ मध्ये लखाभाई सगठिया यांना या जागेसाठी तिकीट देण्यात आले होते आणि भानुबेन राजकोट मुनच्या प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका झाल्या.
4 / 8
४७ वर्षीय भानुबेन बाबरिया फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्या ऑनफिल्ड सक्रिय असतात आणि लोकांमध्ये जाऊन काम करण्याला प्राधान्य देतात.
5 / 8
गुजरातच्या या निवडणुकीत एकूण १५ महिला विधानसभेत पोहोचल्या आहेत. यातील १४ महिला भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या आहेत मात्र भानुबेन यांनाच मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.
6 / 8
भानुबेन यांचे सासरे मधुभाई बाबरिया यांनी यापूर्वी १९९८ मध्ये राजकोट ग्रामीण मतदारसंघातून विजय मिळवला होता.
7 / 8
या निवडणुकीत भानुबेन यांनी आम आदमी पक्षाचे नेते वशराम सगठिया यांचा पराभव केला आहे. भानुबेन यांना १,१९,६९५ मते मिळाली आणि ४८,९४६ मतांच्या फरकाने त्या विजयी झाल्या.
8 / 8
भानुबेन यांनी भाजपच्या १४ महिला आमदारांमधून मंत्रिपदासाठी आपली निवड केल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि सीआर पाटील यांचे आभार मानले. आपल्यावर जी काही जबाबदारी दिली जाईल त्या विभागासाठी कठोर परिश्रम घेण्याची तयारी अशल्याचं भानुबेन म्हणाल्या.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी