Bharat Bandh: Violent turn of the movement, death of nine people
Bharat Bandh: आंदोलनाला हिंसक वळण, नऊ जणांचा मृत्यू By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2018 10:29 PM1 / 7नवी दिल्ली : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्याबाबत (अॅट्रॉसिटी अॅक्ट) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी सोमवारी (दि.2) पुकारलेल्या 'भारत बंद'ला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. 2 / 7मध्य प्रदेश, पंजाब या राज्यांसह इतर राज्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागले. 3 / 7यावेळी आंदोलकांनी ठिकठिकाणी रास्तारोको, रेल्वेरोको केला. तर, काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. 4 / 7भारत बंद दरम्यान उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत देशभरात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मध्य प्रदेशातील सहाजणांचा तर यूपीतील दोघांचा आणि राजस्थानमधील एकाचा समावेश आहे. 5 / 7सोमवारी सकाळपासूनच देशभरातील अनेक राज्यात भारत बंदचे हिंसक पडसाद उमटले. जास्तकरुन उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, राजस्थान, झारखंडमध्ये अनेक दलित आणि आदिवासी संघटनांनी आंदोलन केले. 6 / 7या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना अनेक ठिकाणी लाठीचार्ज करावा लागला. तर उत्तर प्रदेशात मेरठमध्ये आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला, त्यात एकाचा मृत्यू झाला. 7 / 7ग्वाल्हेरमध्ये आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications