Bharat Biotechs Covaxin to get WHO nod this week say sources
Corona Vaccination: कोवॅक्सिन घेतलेल्यांना मोठा दिलासा मिळणार; याच आठवड्यात गुडन्यूज मिळणार By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 6:43 PM1 / 9देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट जवळपास ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे देशात लसीकरण मोहीम वेगानं राबवली जात आहे. लसीकरणाचा वेग वाढल्यास तिसरी लाट थोपणं अधिकाधिक सोपं होईल.2 / 9देशातील लसीकरण अभियानात दोन लसींचा सर्वाधिक वापर होत आहे. सीरमची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या दोन लसी देशभरात वापरल्या जात आहेत. त्यातही भारत बायोटेकची लस संपूर्णत: भारतात निर्माण झालेली आहे.3 / 9कोविशील्ड लस सीरमनं ऑक्सफर्ड आणि ऍस्ट्राझेनेकाच्या मदतीनं तयार केली आहे. कोविशील्डसाठीचं संशोधन परदेशात झालं आहे. तर कोवॅक्सिनसाठीचं संशोधन पूर्णपणे भारतात झालं आहे. तर निर्मितीदेखील भारतातच झाली आहे. त्यामुळे कोवॅक्सिन मेड इन इंडिया लस म्हणून ओळखली जाते.4 / 9कोविशील्डच्या तुलनेत कोवॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर कमी आहे. मात्र या लसीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेनं मान्यता दिलेली नाही. त्यामुळे कोवॅक्सिन घेतलेल्यांना परदेशी जाण्यात अडथळे येत आहेत. कोवॅक्सिन घेतली असल्यानं हजारो विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी जाता येत नाहीए.5 / 9कोवॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळावी यासाठी भारत बायोटेक गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना लवकरच मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. कोवॅक्सिनला याच आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळू शकते. एएनआयनं सुत्रांच्या हवाल्यानं याबद्दलची माहिती दिली आहे.6 / 9केंद्र सरकारनं कोवॅक्सिनच्या वापरास मंजुरी दिली आहे. आणखी अनेक देशांनीदेखील कोवॅक्सिनला परवानगी दिली आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिलेली नाही. 7 / 9शिक्षणासाठी, कामासाठी परदेशी जाऊ इच्छिणारे अनेकजण कोवॅक्सिन घेतल्यानं भारतात अडकले आहेत. कोवॅक्सिनला डब्ल्यूएचओनं मंजुरी न दिल्यानं अनेक देश कोवॅक्सिन घेतलेल्यांना देशात प्रवेश देत नाहीत. मात्र आता लवकरच कोवॅक्सिन लस घेतलेल्यांची ही चिंता मिटणार आहे.8 / 9कोवॅक्सिनचा समावेश आपत्कालीन उपयोगाच्या लसींच्या यादीत करण्यात यावा यासाठी भारत बायोटेकनं जुलैमध्येच डब्ल्यूएचओकडे आवश्यक कागदपत्रं जमा केली होती. त्यानंतर डब्ल्यूएचओनं लसीला मान्यता देण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्यानं याच आठवड्यात कोवॅक्सिन घेतलेल्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.9 / 9डब्ल्यूएचओनं आतापर्यंत फायझर-बायोएनटेक, ऍस्ट्राझेनेका-एसके, ऍस्ट्राझेनेका ईयू, जॉन्सन, मॉडर्ना आणि सिनोफार्मच्या लसींना परवानगी दिली आहे. संपूर्णपणे भारतात तयार झालेली कोवॅक्सिन ही एकमेव लस आहे. ती कोरोना विरोधात ७८ टक्के प्रभावी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications