शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rahul Gandhi: सर्वात मौल्यवान गिफ्ट "दोन काकड्या", आजीची कथा ऐकून राहुल गांधी गहिवरले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 11:13 AM

1 / 10
राहुल गांधींच्या नेतृत्त्वात निघालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो (Congress Bharat Jodo Yatara) यात्रेचा आज ४० वा दिवस आहे. या ४० दिवसांत कर्नाटकातील बेल्लारी येथे भारत जोडो यात्रेने एकूण 1,000 किलोमीटरची पदयात्रा पूर्ण केली आहे. यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जनतेला संबोधित केले.
2 / 10
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, 'सुरुवातीला ही पदयात्रा अवघड वाटत होती, पण नंतर काही एक शक्ती आम्हाला पुढे नेत असल्याचे दिसले. आमची ही यात्रा भाजप आणि आरएसएसच्या विभाजन करणाऱ्या विचारधारेविरोधात आहे. ही विचारधारा म्हणजे, भारतावर झालेला हल्ला आहे. त्यांची ही देशभक्ती नाही, देशविरोधातील काम आहे.'
3 / 10
काँग्रेस नेते राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत. त्यांच्या यात्रेला मोठी गर्दी होत आहे. ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताला नागरिक उभे राहत आहेत. गावखेड्यातही त्यांच्या यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
4 / 10
तरुण वर्गापासून वयोवृद्धांपर्यंत अनेकजण राहुल गांधींना भेटण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे राहुल गांधींनी शक्य त्यांना भेटी देऊन त्यांचं समाधान करत आहेत. त्यांच्यासमवेत फोटो काढून ते सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.
5 / 10
राहुल गांधींच्या यात्रेत दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आठवणी जागल्या जात आहेत दोनच दिवसांपूर्वी इंदिरा गांधींच्या मतदारसंघातून राहुल गांधींची यात्रा गेली. त्यावेळी, एक भावनिक प्रसंग घडला. हे पाहून राहुल गांधीही गहिवरले.
6 / 10
राहुल गांधींना एका वृद्ध महिलेनं भेटून दोन काकड्या हातात दिल्या. या काकड्या देऊन आपणं इंदिरा गांधींचं कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत आहोत, असे महिलेनं म्हटलं. काहीवेळ राहुल गांधींनाही काहीच समजलं नाही. मात्र, पूर्ण स्टोरी ऐकल्यावर त्यांनाही गहिवरुन आलं.
7 / 10
माझं कुटुंब खूप गरीब आहे, माझ्याकडे जमापूँजी म्हणून केवळ माझी शेती आहे. जे शेत मला भूमी सुधारणा अधिनियम कायद्यांतर्गत इंदिरा गांधी यांच्यामुळे मिळालं. याच शेतातून मी या काकड्या आणल्या आहेत.
8 / 10
तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे सर्वात महागडी भेटवस्तू हीच आहे, असे म्हणताना या वृद्ध महिलेचे डोळे पाणावले होते. त्यावेळी, राहुल गांधींनी त्या वृद्ध महिलेची गळाभेट घेत तिच्याकडील काकडी हातात घेतली. महिलेने राहुल गांधींना आशीर्वाद दिला अन् ते पुढे निघाले.
9 / 10
कांग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा किस्सा शेअर केला आहे. त्यासोबतच, महिलेचे राहुल गांधीसमवेतचे फोटोही शेअर केले आहेत. तसेच, ही घटना आपल्या डोळ्यासमोर घडल्याचंही त्यांनी सांगितलंय.
10 / 10
दरम्यान, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरुवात झाली. 3750 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्यानंतर हा प्रवास जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये संपेल. यात्रेत सहभागी असलेले सर्व सदस्य या कालावधीत 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जातील.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसIndira Gandhiइंदिरा गांधी