bhopal madhya pradesh betul sp ips simala prasad success story who cracked upsc in first attempt
कोचिंगविना UPSC उत्तीर्ण, बॉलीवूडमध्येही जलवा...'या' सौंदर्यवती IPS ची गुन्हेगारांमध्ये दहशत! By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 8:04 PM1 / 8IPS Simala Prasad: आज आपण एका अशा IPS अधिकाऱ्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जिची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. सिमला प्रसाद असे या महिला आयपीएस अधिकाऱ्याचे नाव असून तिनं बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सिमला प्रसाद या कडक स्वभावाच्या पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या नावाने गुन्हेगारही घाबरतात. आयपीएस सिमला प्रसाद यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया...2 / 8सिमला प्रसाद या भोपाळ येथील रहिवासी आहेत. त्यांनी भोपाळ येथून शिक्षण घेतले आहे. सिमालाचे सुरुवातीचे शिक्षण सेंट जोसेफ कोएड स्कूलमध्ये झाले. यानंतर त्यांनी भोपाळ विद्यापीठातून स्टुडंट फॉर एक्सलन्समधून बीकॉम आणि पीजी केलं. यानंतर पीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली. सिमला ही सुवर्णपदक विजेती असून तिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी भोपाळच्या बरकतुल्ला विद्यापीठातून समाजशास्त्रात पीजी केलं आहे.3 / 8अभ्यासात हुशार असलेल्या सिमला प्रसाद यांनी PCS परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर डीएसपी म्हणून पहिली पोस्टिंग मिळाली. या नोकरीनंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासविना पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली आणि त्या आयपीएस अधिकारी बनल्या. स्वअभ्यासातूनच त्यांनी हे स्थान मिळवलं.4 / 8सिमला जेव्हा UPSC उत्तीर्ण झाल्या तेव्हा म्हणाल्या होत्या की, 'सिव्हिल सेवेत जॉईन होण्याचा विचार कधीच केला नव्हता, पण घरच्या वातावरणाने माझ्यात IPS होण्याची इच्छा निर्माण केली. देशसेवेसाठी यापेक्षा चांगले व्यासपीठ असू शकत नाही, असे मला वाटले.5 / 8सिमला प्रसाद यांचे वडील डॉ. भगीरथ प्रसाद हे माजी आयपीएस आणि खासदार आहेत. दुसरीकडे, आई मेहरुन्निसा परवेझ या सुप्रसिद्ध साहित्यिका असून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (पासिंग आऊट परेड दरम्यानचे छायाचित्र)6 / 8मध्य प्रदेशातील दिंडोरी येथे पोस्टिंगदरम्यान, सिमला प्रसाद यांनी आपल्या कणखर प्रतिमेने लोकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली. नक्षलग्रस्त दिंडोरीतील गुन्हेगारीला बऱ्याच अंशी आळा बसला आहे. सिमला यांनी आपल्या कामाने या क्षेत्रात नाव कमावले होते. गुन्हेगार त्यांना घाबरत असत.7 / 8सिमाला प्रसाद सध्या मध्य प्रदेशातील बैतुलमध्ये एसपी म्हणून कार्यरत आहेत.8 / 8दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान सिमाला प्रसाद यांनी चित्रपट दिग्दर्शक जैगुम इमाम यांची भेट घेतली. सिमालाचा साधेपणा, सौंदर्य आणि त्यांची प्रतिभा पाहून जयगमने तिला त्याच्या 'अलिफ' चित्रपटात भूमिकेची ऑफर दिली. यानंतर सिमालाने 'अलिफ' या चित्रपटाद्वारे चित्रपटांमध्ये पदार्पण केले आणि हा चित्रपट फेब्रुवारी २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २०१९ मध्ये आलेल्या 'नक्कश' चित्रपटात त्यांनी पत्रकाराची भूमिका साकारली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications