big news for army manali leh road will be restored in a week vrd
लष्करासाठी गूड न्यूज! मनाली-लेह मार्ग तयार, आठवड्याभरात उघडला जाणार By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 12:23 PM1 / 10रणनैतिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला जवळपास 1100 किमी लांबीचा मनाली-लेह रस्ता लवकरच वाहतुकीसाठी पूर्ववत होणार आहे. 2 / 10यासाठी जवळपास एक आठवडा लागू शकेल. यंदा कोरोनामुळे पर्यटकांची रेलचेल बंद आहे. परंतु जर परिस्थिती सामान्य झाली, तर पर्यटकांना या मार्गाचा आनंददायक प्रवास अनुभवता येईल.3 / 10बीआरओ कठोर परिश्रमानंतर मनाली-लेह मार्ग पूर्ववत करण्याच्या जवळपास पोहोचला आहे. 4 / 10बीआरओच्या लेह येथील हिमांक परियोजनेंतर्गत हा रस्ता तयार करण्यात आला आहे. मनाली येथील दीपक परियोजनेचे कर्मचारी दोन्ही बाजूच्या बरलाचा खिंडीतून बर्फ हटवण्याचं काम करत आहेत. 5 / 10मार्ग खुला केल्यानंतर सीमेवर तैनात सुरक्षा दलांपर्यंत पोहोचणे सहजशक्य होणार आहे. 6 / 10मनालीला पोहोचल्यावर पर्यटक 13050 फूट उंचीवर रोहतांग खिंड पाहता येणार आहे. येथून पुढे 16000 फूट उंच बरलाचा पास दिसू शकणार आहे.7 / 10याखेरीज लेहच्या मैदानामध्ये गेल्यानंतर 16500 फूट उंच लाचुंगला खिंड ओलांडल्यानंतर तुम्हाला जगातील सुंदर 17½ फूट तांगलांगला पास दिसू शकेल. 8 / 10बीआरओ कमांडर कर्नल उमा शंकर म्हणाले की, त्यांनी यावेळी दोन्ही बाजूंनी बरलाचा खिंडाची चढाई केली आहे.9 / 10हवामानानं साथ दिल्यास आठवड्याभरात ते पूर्ववत होईल.10 / 10हा रस्ता खुला झाल्यानंतर पर्यटकांनाही याचा मनमुराद आनंद लुटता येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications