Big rail accident that happened in the country in 2017
2017 मध्ये देशात झालेले मोठे रेल्वे अपघात By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 6:23 PM1 / 4महाकौशल एक्सप्रेस अपघात, 30 मार्च 2017- उत्तर प्रदेशमध्ये महाकौशल एक्सप्रेसला 30 मार्च 2017 ला झालेल्या अपघातात 52 प्रवासी जखमी झाले होते. महाकौशल एक्सप्रेस मध्य प्रदेशमधील जबलपूरपासून हजरत निजामुद्दीन, दिल्ली यादरम्यान धावते. 2 / 4कैफियत एक्स्प्रेस अपघात, 23 ऑगस्ट 2017 - उत्तर प्रदेशातील कानपूर आणि इटावा दरम्यान औरैया जिल्ह्यात 12225 (अप) कैफियत एक्स्प्रेसचा 23 ऑगस्ट 2017 ला अपघात झाला. एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात 74 प्रवासी जखमी झाले. 3 / 4उत्कल एक्सप्रेस अपघात 18 ऑगस्ट 2017 - उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात 18 ऑगस्ट 2017 रोजी पुरी-हरिद्वार-कलिंगा एक्सप्रेसचे 14 डबे घसरून झालेल्या भीषण अपघातात 23 प्रवासी मृत्युमुखी पडले, तर 40 जण जखमी झाले. 4 / 4हिराखंड एक्स्प्रेस अपघात, 22 जानेवारी 2017 - जगदलपूर-भूवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसला 22 जानेवारी रोजी झालेल्या अपघातात 36 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications