शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 11:58 IST

1 / 7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावेळी पर्यटकांमध्ये नौदलाचा अधिकारी देखील पत्नीसह उपस्थित होता. दहशतवाद्यांनी त्याला देखील गोळी झाडली होती. परंतू, त्यापूर्वी लेफ्टनंट विनय नरवाल यांनी या दहशतवाद्यांशी दोन हात केले होते, असे समोर येत आहे.
2 / 7
नरवाल यांनी दोन दहशतवाद्यांना बखोटीत पकडले होते. परंतू, त्यापैकी एकाने त्यांच्या पकडीतून सुटून डोक्यावर गोळी झाडली. नौदलाचा अधिकारी सुटीवर असताना देखील दहशतवाद्यांशी लढला व धारातीर्थी पडला.
3 / 7
विनय यांची पत्नी हिमांशी यांनी कुटुंबीयांना फोनवर याची माहिती दिली होती. विनयने दोन दहशतवाद्यांना पकडले होते. दोघांनाही बखोटीत धरल होते. परंतू, एकाने जोर लावून त्यांच्या तावडीतून सुटण्यात यश मिळविले. त्यानेच विनयच्या डोक्यात गोळी झाडली, असे तिने सांगितले होते.
4 / 7
दहशतवादी हल्ल्यानंतर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत होता. यात पिवळसर जॅकेट घातलेली महिला मदत मागत होती. दहशतवाद्यांनी नाव विचारले मग धर्म विचारला आणि गोळी मारल्याचे ती सांगत होती. विनयच्या मृतदेहाशेजारी ती बसलेला फोटो देखील व्हायरल होत होता.
5 / 7
लेफ्टनंट विनय हे हॉटेलमधून बाहेर पडले होते. तिथे ते पत्नीसह काहीतरी खाण्यासाठी थांबले होते. तेव्हाच हा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर हिमांशीने विनयचे काका सुरजित नरवाल यांना फोन केला होता, असे विनय यांचे आजोबा हवा सिंह यांनी सांगितले.
6 / 7
पहलगामच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरत असताना, एका ठिकाणी काही लोक थांबलेले दिसले. तिथेच भेळपुरी खायला सुरुवात केली. मग दहशतवादी आले. कोणालाही काही समजण्यापूर्वीच दहशतवाद्यांनी त्यांची शस्त्रे बाहेर काढली. सगळे घाबरले. लोकांची नावे आणि धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, असे हिमांशीने घरच्यांना सांगितले.
7 / 7
विनयचा वाढदिवस १ मे रोजी होता. हनिमूनवरून परतल्यानंतर त्याच्यासाठी एक मोठी पार्टी आयोजित केली जाणार होती. यानंतर विनय ३ मे रोजी हिमांशीसोबत कोचीला परतणार होता, असे घरच्यांनी सांगितले.
टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरindian navyभारतीय नौदलPakistanपाकिस्तान