शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बिग सॅल्यूट ! सैन्यानं 36 तास अथक परिश्रम घेऊन खुला केला 'मेन रोड'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 1:31 PM

1 / 10
संकट देशावरील असो किंवा देशात असो, भारतीय सैन्य सदैव संकटाचा सामना करण्यासाठी तत्पर असतो. ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता भारतीय सैन्य देशाच्या, नागरिकांच्या मदतीला धावतं.
2 / 10
भूदल, वायूदल आण नौ दल या तिन्ही दलांसह सैन्य दलातील इतरीह तुकड्या सदैव तत्पर असतात. सध्या तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यानंतरही नागरिकांच्या मदतीसाठी सैन्य दलाने धाव घेतली आहे.
3 / 10
एनडीआरएफचे जवान पाण्यात उतरुन, पडलेली झाडे तोडून लोकांच्या जीवन सुरळीत करण्यासाठी धडपडताना दिसत आहे. महाराष्ट्रासह 8 राज्यांत बसलेल्या तडाख्याला सावरण्याचा प्रयत्न होत आहे.
4 / 10
दिव-दमण मध्येही या वादळाचा चांगलाच तडाखा बसलाय, दिवमधील मेन रोड या वादळाच्या तडाख्यात पडलेल्या झाडांमुळे बंद झाला होता. त्यामुळे, भारतीय सैन्याच्या जवांनी घटनास्थळी धाव घेतली.
5 / 10
सैन्य दलाच्या 36 तासांच्या अथक परिश्रमानंतर दीव येथील प्रमुख रस्ता सर्वांसाठी खुला झाला आहे. हा मेन रोड बंद झाल्याने नागरिकांचा संपर्कच तुटला होता. त्यात वीजपुरवठाही खंडीत झाला होता.
6 / 10
कोरोनामुळे रुग्णवाहिक आणि वैद्यकीय सेवांसाठी वाहनांची ये-जा सुरू आहे. मात्र, चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे तब्बल 36 तासांपर्यंत हा रस्ता प्रवासासाठी वापरात येत नव्हता, अखेर सैन्य दलाने मोहिम फत्ते केली.
7 / 10
तौक्ते’ चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे गुजरातच्या १२ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत ४५ जणांचा मृत्यू झाला असून, प्रचंड नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी चक्रीवादळाने प्रभावित भागाची हवाई पाहणी केली. मुख्यमंत्री विजय रुपाणी हेदेखील त्यांच्यासोबत होते.
8 / 10
मुंबईत तौक्ते चक्रीवादळामुळे उधाणलेल्या समुद्राच्या तडाख्यात सापडून भरकटलेल्या ५ नौकांपैकी पी-३०५ या बार्जवरील २६ जणांचे मृतदेह बुधवारी तटरक्षक दल पथकाच्या हाती लागले. उर्वरित ४९ जणांचा शोध अद्याप सुरूच आहे.
9 / 10
चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने पी-३०५ या बार्जवरील (कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय असणारी मोठी तराफा) २७३ जणांचा जीव धोक्यात आला होता. याशिवाय, गॅल कन्स्ट्रक्टरवर १३७, ‘सागरभूषण’वर १०१, तर एस. एस. -३ वर १९६ जण अडकून पडले होते.
10 / 10
भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची, आयएनएस कोलकत्ता, आयएनएस तलवार या युद्धनौकांसह बेतवा, तेग, बिआस ही जहाजे पी-८१ विमानासह सी-किंग हेलिकाॅप्टर्स या बचावकार्यात गुंतली आहेत. याशिवाय, तटरक्षक दलाच्या सम्राट, अन्य जहाजे आणि चेतक हेलिकाॅप्टर्ससह खासगी संस्थांकडून मदतकार्यासाठी लागणारी टोईंग आणि अन्य जहाजे या कामात वापरण्यात येत आहेत.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवानTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळroad transportरस्ते वाहतूक