शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जयंती विशेष : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 'या' ५ प्रेरणादायी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 5:10 PM

1 / 5
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२१ जयंती. त्यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ मध्ये झाला आणि देशाला एक नेतृत्व मिळालं. ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले एक महत्त्वाचे नेते होते. इंग्रजांना देशातून पळवून लावण्यात त्यांनी त्यांच्या सेनेसोबत फार महत्त्वाची कामगिरी केली.
2 / 5
दुसऱ्या महायुध्दात भारतीय सेनेच्या आझाद हिंद फौजेच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. ‘तुम मुझे खुन दो, मैं तुम्हे आझादी दुंगा’ या नेताजींच्या घोषणेमुळे अनेक तरुण स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले. आजही या शब्दांमुळे मनात देशभक्तीची तीव्र भावना जागृत होते.
3 / 5
त्यांनी पुर्व आशियात भारतीय राष्ट्रवादी चळवळीचं नेतृत्व केलं आणि जर्मनीत आझाद हिंद रेडिओ स्टेशन सुरु केलं. स्वामी विवेकानंदांच्या वैश्विक बंधुभावाच्या शिकवणीवर त्यांचा विश्वास होता.
4 / 5
शालेय आणि विद्यापिठातील शिक्षणादरम्यान ते फार हुशार होते आणि त्यांनी नेहमी वरचा क्रमांक मिळवला. १९१८ला ते तत्त्वज्ञान विषयात बी.ए.मध्ये फर्स्ट क्लासने पदवीधर झाले.
5 / 5
१९२०मध्ये ते इंग्लंडमध्ये इंडीयन सिव्हिल सर्व्हिस परिक्षा पास झाले मात्र नंतर स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी १९२१ला आपल्या या नोकरीचा राजीनामा दिला.
टॅग्स :Netaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसEnglandइंग्लंड