शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

८ वर्षांपूर्वी लग्न केले, अभिनेत्री पत्नी हातही लावू देत नाही; खासदाराच्या तक्रारीवर कोर्टाचा निर्णय आला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 4:03 PM

1 / 8
उडिया चित्रपट क्षेत्राची हिरोईन वर्षा प्रियदर्शिनी आणि अभिनेता खासदार अनुभव मोहंती यांचे खासगी प्रकरण खूप चर्चेत आले आहे. अनुभव हे बीजेडीचे खासदार आहेत. या दोघांचा हायप्रोफाईल घटस्फोट सध्या चर्चेत आला आहे.
2 / 8
२०१४ मध्ये दोघांचे लग्न झाले होते. मात्र, काही काळानंतर दोघांमध्ये वाद होऊ लागले आणि प्रकरण कोर्टात गेले. यावर कोर्टाने नुकताच एक आदेश दिला आहे. खासदार मोहंती यांनी पत्नी वर्षाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती.
3 / 8
लग्नाला वर्षे लोटली तरी देखील ती शरीरसंबंध ठेवायला देत नाही. नैसर्गिक वैवाहिक जीवन नाकारत असल्याचा दावा खासदार मोहंती यांनी केला होता. अनेकदा मोहंती यांनी शरीर संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र नेहमीच निराश झालो, असे मोहंती यांनी याचिकेत म्हटले होते.
4 / 8
तर दुसरीकडे वर्षा प्रियदर्शिनीने देखील अनुभव मोहंतीवर तिला आई बनू देत नसल्याचे आरोप केले आहेत. मोहंती हा दारुडा आहे आणि त्याची अनेक लफडी आहेत, असे तिने तिच्या याचिकेमध्ये म्हटले आहे. एकंदरीत हा सारा प्रकार घटस्फोटाचा आहे.
5 / 8
मोहंती गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर पत्नीसोबतच्या सेक्स लाईफवर बोलत आहेत. गेल्या आठ वर्षांपासून प्रियदर्शनीसोबत कौटुंबीक वादामुळे शरीर संबंध ठेवू शकलो नाही, असे ते म्हणाले होते. वर्षामुळे माझे कुटुंब मानसिक तनावात आहे, मी राजकीय क्षेत्रातही लक्ष देऊ शकत नाहीय. मला तिच्यापासून घटस्फोट हवा आहे, न्यायालयात हे प्रकरण आहे, असे मोहंती म्हणाले होते.
6 / 8
मोहंतीच्या या पोस्टनंतर वर्षानेही सोशल मीडियावर पतीवर आरोप केले आहेत. पती त्रास देत असल्याचा आरोप करून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला आहे. तसेच अनैतिक संबंधांचे आरोपही केले आहेत.
7 / 8
ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील एसडीजेएम कोर्टाने निर्णय दिला आहे. वर्षाला पती मोहंती यांच्या घरातून बाहेर पडण्यास सांगितले आहे. तसेच मोहंतीने तिला ३०००० रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. आता घटस्फोटाचे प्रकरण ओडिशा उच्च न्यायालयात सुरु आहे.
8 / 8
2014 मध्ये मोहंती राज्यसभा खासदार झाले. यानंतर ते २०१९ मध्ये केंद्रपाडा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
टॅग्स :OdishaओदिशाParliamentसंसदmarriageलग्न