शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

निवडणुकीपूर्वीची भाजपाची 'अशी' रणनीती; ज्यानं हरियाणात बिघडला काँग्रेसचा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 4:57 PM

1 / 10
हरियाणा विधानसभा निकालाने अनेकांना आश्चर्यचकीत केले आहे. भाजपा सलग तिसऱ्यांदा राज्यात सरकार बनवणार आहे. या राज्याच्या निकालाने अनेक एक्झिट पोलचे आकडे खोटे ठरवलेत. एक्झिट पोलमध्ये काँग्रेस मोठ्या फरकाने विजयाचे दिशेने जातानाचे चित्र आकडेवारीतून दिसत होते.
2 / 10
हरियाणात भाजपाने सहज इतिहास रचला नाही, तर त्यामागे अमित शाह यांचा एक जुना फॉर्म्युला आहे ज्यानं हरियाणातील भाजपाच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. हरियाणात मागील १० वर्ष भाजपा सत्तेत आहे. त्यामुळे अॅन्टी इन्कम्बेंसीसह इतर मुद्दे होते ज्यामुळे भाजपाला नुकसान होताना दिसत होते. मात्र भाजपाने हरियाणा निवडणुकीच्या ७ महिने आधी असा डाव खेळला ज्यामुळे काँग्रेस चारीमुंड्या चीत झाले
3 / 10
भाजपाने हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या ७ महिन्याआधी अचानक तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना पदावरून हटवले. खट्टर यांच्या नेतृत्वातच २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपाला बहुमत मिळालं नाही. त्यामुळे जेजेपीच्या पाठिंब्यावर राज्यात भाजपाला सत्तेत यावे लागले.
4 / 10
२०२४ च्या निवडणुकीत भाजपा कुठलाही धोका पत्करू इच्छित नव्हती. त्यासाठी ७ महिन्याआधी खट्टर यांना मुख्यमंत्रि‍पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यांच्या जागी नायब सिंग सैनी यांच्याकडे नेतृत्व दिले. भाजपाने सैनी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवत जनतेसमोर नवा पर्याय दिला. जनतेने सैनी यांच्यावर विश्वास दाखवला. त्यामुळं यंदा भाजपा पूर्ण बहुमतात सरकार बनवताना दिसत आहे.
5 / 10
अमित शाहांचा हा फॉर्म्युला हरियाणासह आधी ४ राज्यांमध्ये हिट राहिला आहे. अचानक निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री चेहरा बदलणे, नवीन चेहऱ्यासोबत जनतेमध्ये उतरणे हा फॉर्म्युला भाजपासाठी नवीन नाही. याआधी भाजपाने त्रिपुरा इथं हा फॉर्म्युला वापरला. त्यासह उत्तराखंड, गुजरातमध्येही हेच सूत्र अवलंबले त्याचा फायदाही पक्षाला झाला.
6 / 10
हरियाणा राज्याचा राजकीय इतिहास पाहिला तर त्याठिकाणी कुठल्याही पक्षाने तिसऱ्यांदा सत्ता मिळवली नाही. राज्यातील एकूण ९० जागांपैकी भाजपा ५० जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेसला राज्यात ३५ जागांवर आघाडी आहे. निवडणुकीच्या कलांनुसार या राज्यात पुन्हा भाजपा सरकार येणार हे स्पष्ट आहे.
7 / 10
हरियाणात भाजपाला मिळालेल्या जागा पाहता निवडणुकीआधी जवान, शेतकरी आणि पैलवान यांच्या नाराजीचा कुठलाही फटका बसलेला दिसत नाही. निवडणुकीआधी जाट समुदाय भाजपावर नाराज होता. त्यामुळे भाजपानं दक्षिण हरियाणातील अहिरवाल क्षेत्रावर लावला. मागील २ विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेच्या खुर्चीपर्यंत याच भागाने पोहचवलं होते.
8 / 10
हरियाणासारखेच उत्तराखंड निवडणुकीपूर्वी भाजपाने नेतृत्व बदल केले होते. याठिकाणी तीरथ सिंह यांना हटवून पुष्कर सिंह धामी यांना नेतृत्व सोपवले. उत्तराखंड निवडणुकीपूर्वी समान नागरी संहिता लागू करण्यात आली. त्या फॅक्टरनं अँन्टी इन्कम्बेंसीला मागे सारत पक्षाला राज्यात एकूण ७० जागांपैकी ४७ जागांवर विजय दिला.
9 / 10
हरियाणात प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करणारे नायक सिंह सैनी यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवण्यात आले. त्यांनी आपल्या रणनीतीने भाजपाला राज्यात मोठा विजय प्राप्त करून दिला. भाजपा हरियाणात पराभूत होईल असं अनेकजण विश्लेषण करत होते. मात्र सैनी यांचा चेहरा आणि भाजपाची रणनीती इथेही यशस्वी ठरली.
10 / 10
२०१४ च्या मोदी लाटेत हरियाणात भाजपाला ३३.२० टक्के मते मिळत ४७ जागा मिळाल्या, त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत ३६.४७ मतांसह ४० जागांवर भाजपाने विजय मिळवला. यंदाच्या निवडणुकीत नायक सिंह सैनी यांच्या नेतृत्वात पक्षाला ३९.६७ टक्के मतदान झाले, त्यात ५० जागांवर भाजपाला आघाडी मिळाली आहे.
टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसAmit Shahअमित शाह