1 / 8गेल्या दोन महिन्यापासून सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पर्वाचा अखेर आज मतमोजणीचा दिवस आला. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर ४००पारचा नारा देणाऱ्या भाजपाप्रणित एनडीएला मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसले. भाजपाला काही राज्यांमध्ये अपेक्षित यश मिळू शकले नाही. जाणून घेऊया त्याबद्दल...2 / 8देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपाला फटका बसला. २०१९ मध्ये भाजपने ८० पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी भाजपाला ५०% च्या जवळपास जागांवर आघाडी घेता आली. अखिलेश यादवांच्या सपाने २८ तर काँग्रेसने ६ जागांवर आघाडी घेतली.3 / 8भाजपचा बालेकिल्ला असलेल्या बिहारमध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. २०१९ मध्ये भाजपाने १७ जागा जिंकल्या होत्या. यावेळी मात्र त्यांना १२ जागांवर आघाडी घेता आली. यावेळी जदयू १२ जागांवर, लोजप ५, राजद ४ आणि काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर आहे.4 / 8राज्यातील अंतर्गत कलहाचा ट्रेंडनुसार भाजपला फटका बसला. २०१९ च्या निवडणुकीत राज्यातील २५ पैकी २४ जागा जिंकणारा भाजप यावेळी सुमारे १३च्या जागांवरच आघाडी मिळवू शकला. काँग्रेसने ९ जागांवर तर अपक्षांनी ३ जागांवर आघाडी घेतली.5 / 8महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणाला मतदारांनी नाकारले आणि महाविकास आघाडीला पसंती दर्शवली. गटबाजीमुळे राज्यात ४८ पैकी भाजपाला फक्त १२ जागांच्या आसपास आघाडी मिळाली. काँग्रेसने सुमारे १२ जागांवर, शिवसेना ठाकरे गटाने १० जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार ६ जागांवर तर शिवसेना शिंदे गट ६ जागांवर आघाडीवर घेतली.6 / 8२०१९च्या लोकसभेत हरयाणाने सर्व १० जागा जिंकणारा भाजपा २०२४मध्ये संघर्ष करताना दिसला. मतमोजणीच्या कलांमध्ये भाजपाला केवळ ४ जागांवरच आघाडी घेता आली.7 / 8२०१४ असो किंवा २०१९ असो, भाजपाने दिल्लीच्या सातही जागांवर आपले वर्चस्व राखले होते. पण यावेळी २०२४च्या निवडणुकीत भाजपाला ६ जागांवरच आघाडी मिळाली तर १ जागेवर पिछाडीचा सामना करावा लागला.8 / 8२०१९च्या झारखंडमध्ये भाजपाने १४ पैकी ११ जागा जिंकल्या होत्या. त्याचवेळी, २०२४मध्ये निवडणुकीच्या कलांमध्ये भाजपा केवळ ७ जागांवर आघाडी घेऊ शकली. तर जेएमएम २ जागांवर, काँग्रेस २ आणि एजेएसयू पक्षाने १ जागेवर आघाडी घेतली.