शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

BJP: काँग्रेसच्या लाटेतही कमळ फुलवलं; जाणून घ्या, ‘हे’ आहेत भाजपाचे पहिले २ खासदार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 3:15 PM

1 / 11
१९८० मध्ये देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसनं सर्वाधिक ३५३ जागा जिंकल्या. तर जनता पार्टीचे ३१ खासदार निवडून आले होते. हीच जनता पार्टी ३ वर्षापूर्वी १९७७ मध्ये प्रचंड बहुमतात सत्तेत आली होती.
2 / 11
निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर जनता पार्टीने आढावा घेतला. राष्ट्रीय कार्यकारणीत या पराभवामागे नेत्यांची दुटप्पी भूमिका जबाबदार असल्याचं बोलले गेले. आणीबाणीच्या काळात अनेक विरोधी पक्षाच्या प्रभावात पार्टीच्या विचारधारेमुळे अडचणीत आली होती.
3 / 11
समाजवादीचे नेत्यांनी जनसंघाच्या नेत्यांवर दुटप्पी भूमिका घेण्यासाठी बंदी आणण्याची मागणी करत होते. अशावेळी जनता पार्टीच्या नेत्यांनी एकतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात राहावं अथवा पक्षासाठी काम करावं हे सांगण्यात आले. मात्र दोन्ही पैकी एक पर्याय निवडावा लागेल.
4 / 11
या बंदीचा परिणाम असा झाला की, भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी जनता पक्षापासून फारकत घेतली. ६ एप्रिल १९८० रोजी या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी नावाची नवीन राजकीय संघटना स्थापन केली. येथूनच भाजपाची सुरुवात झाली. नवीन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांची निवड करण्यात आली.
5 / 11
देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी हत्या झाली. देशभरात गदारोळ झाला. काँग्रेसने तातडीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आणि निवडणूक आयोगाने त्याची घोषणा केली. १९८४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच उतरली होती.
6 / 11
या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसचे ४०४ उमेदवार विजयी झाले. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या खात्यात केवळ २ जागा आल्या. त्यानंतर पंतप्रधान राजीव गांधी यांनीही त्याची खिल्ली उडवली होती.
7 / 11
डॉ. ए.के.पटेल आणि चंदुपातला जंगा रेड्डी यांनी काँग्रेसच्या लाटेतही भाजपला विजय मिळवून दिला. गुजरातमधील मेहसाणा मतदारसंघातून पटेल विजयी झाले, तर चंदुतला रेड्डी आंध्र प्रदेशातील हनमकोंडा मतदारसंघातून खासदार झाले. चला जाणून घेऊया दोघांबद्दल.
8 / 11
डॉ. ए.के. पटेल: राजकारणात प्रवेश केलेले एमबीबीएस डॉक्टर. वडिलांचे नाव कालिदास पटेल. डॉ. पटेल यांचा जन्म १ जुलै १९३१ रोजी मेहसाणा येथे झाला. ते गुजरातमधील सर्वात मोठ्या डॉक्टरांपैकी एक होते. १९७५ ते १९८४ पर्यंत ते गुजरात विधानसभेचे सदस्य होते.
9 / 11
चंदूपातला जंगा रेड्डी: चंदूपातला जंगा रेड्डी यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९३५ रोजी झाला. ते आंध्र प्रदेशातील वारंगल जिल्ह्यातील एका गावातील शाळेत शिक्षक होते. भारतीय जनसंघ सुरू झाल्यावर ते त्यात सामील झाले. १९६७ ते १९८४ या काळात ते सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले. १९८४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाने लोकसभेसाठी उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे पीव्ही नरसिंह राव यांचा पराभव केला, जे नंतर देशाचे पंतप्रधान झाले.
10 / 11
जंगा रेड्डी हे दक्षिणेकडील राज्यांतील भाजपचे पहिले खासदार होते. विद्यार्थीदशेपासून सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेले रेड्डी यांनी रामजन्मभूमी आंदोलनासह अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला. तेलंगणा सत्याग्रह चळवळीतही ते सक्रिय होते.
11 / 11
भाजपचे संस्थापक अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी यांचाही १९८४ च्या निवडणुकीत पराभव झाला होता. काँग्रेसच्या झंझावातामध्ये माधवराव शिंदे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. शिंदे राजघराण्यातील माधव राव यांना ग्वाल्हेरमधून पराभूत करणे जवळजवळ अशक्य असल्याचं म्हटलं जात होते.
टॅग्स :BJPभाजपा