पंतप्रधान, ६ मुख्यमंत्री, ९ मंत्री, १०० पेक्षा जास्त खासदार यांनी लावली दिल्लीत ताकद, तरीही पराभव By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 8:06 PM
1 / 6 दिल्लीच्या रणांगणात आम आदमी पक्षाला मोठं यश मिळालं आहे. ७० पैकी ६२ जागांवर अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाचे उमेदवार निवडून आलेत. दिल्ली जिंकण्यासाठी भाजपाने सर्व ताकद पणाला लावली तरीही त्यांच्यावर एकटे केजरीवाल भारी पडले. 2 / 6 दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ६ मुख्यमंत्री, ९ मंत्री आणि ४० स्टार प्रचारक, १०० पेक्षा जास्त खासदार यांना प्रचारासाठी उतरवलं होतं. 3 / 6 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिल्लीत २ जाहीर सभा झाल्या होत्या. राहुल गांधी यांच्या ४ सभा झाल्या होत्या. अरविंद केजरीवाल यांनी ३ मोठे रोड शो केले होते. 4 / 6 गृहमंत्री अमित शहा यांनी २५ दिवसांपूर्वी द्वारका येथील भारत वंदना पार्क येथून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला होता. 5 / 6 मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रोड शोसोबत छोट्या छोट्या सभा घेतल्या. तब्येतीच्या कारणास्तव सोनिया गांधी यांनी दिल्लीत सभा घेतली नाही. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राहुल आणि प्रियंका गांधी यांच्या ४ सभा झाल्या. 6 / 6 मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रोड शोसोबत छोट्या छोट्या सभा घेतल्या. तब्येतीच्या कारणास्तव सोनिया गांधी यांनी दिल्लीत सभा घेतली नाही. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राहुल आणि प्रियंका गांधी यांच्या ४ सभा झाल्या. आणखी वाचा