शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डोअर टू डोअर कँपेन, मॅरेथॉन सभा अन् युतीवर फोकस; तमिळनाडूसाठी BJP चा मेगाप्लॅन तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 21:33 IST

1 / 9
BJP vs DMK : भारतीय जनता पक्षाने (भाजप) पुढील वर्षी होणार्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन आपल्या सरकारच्या अपयशावरुन लक्ष वळवण्यासाठी तामिळनाडू विरुद्ध केंद्र, असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि 'अण्णाद्रमुक'मधील कटुता कमी होताना दिसत आहे. भाजपनेही युतीबाबतची भूमिका मवाळ केली आहे. यासोबतच भाजपने अण्णाद्रमुकसोबत युतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
2 / 9
राज्यातील भाजपाध्यक्ष अन्नामलाई यांनी द्रमुकला राज्यातील सत्तेतून बेदखल करण्यासाठी AIADMK सोबतच्या संभाव्य युतीबाबत उदारता दाखवली आहे. तसेच, AIADMK सरचिटणीस ई. पलानीस्वामी यांनीदेखील भाजपसोबत युतीची शक्यता नाकारली नाही.
3 / 9
तमिळनाडूमध्ये सीमांकन आणि हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपने तामिळनाडूतील लोकांपर्यंत थेट जाण्याची योजना आखली आहे. राज्यातील स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी सरकारचा पर्दाफाश करणे, हा भाजपचा उद्देश आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या समर्थनार्थ राज्यातील एक कोटी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने गेल्या महिन्यातच स्वाक्षरी मोहीम सुरू केली. या मोहिमेद्वारे भाजप तामिळनाडूमध्ये घरोघरी जाऊन लोकांना सांगेल की, स्टॅलिन सरकार राजकीय फायद्यासाठी जाणूनबुजून हिंदीबद्दल संभ्रम पसरवला जात आहे.
4 / 9
भाजपच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पक्षाच्या हायकमांडला असे वाटते की, यामुळे द्रमुकच्या दाव्याला तोंड देण्यासाठी पक्षाला मदत होईल. तसेच, भाजप नेते आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि जनतेशी संपर्कदेखील दिसून येईल. आंदोलनाचा भाग म्हणून येत्या काही दिवसांत पक्षातर्फे राज्यातील विविध शहरांमध्ये मोठमोठ्या रॅलीही काढण्यात येणार आहेत. राज्यातील द्रमुक सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा भाजपचा दावा आहे.
5 / 9
भाजपच्या हायकमांडने तामिळनाडूमध्ये विविध ठिकाणी रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. 23 मार्चला तिरुचिरापल्लीमध्ये रॅली, 29 मार्च रोजी तिरुनेलवेली येथे रॅली, 5 एप्रिलला वेल्लोरमध्ये रॅली, 12 एप्रिलला कांचीपुरममध्ये रॅली, 19 एप्रिल रोजी सेलममध्ये रॅली, 26 एप्रिलला चेन्नईत रॅली, 3 मे रोजी मदुराईमध्ये रॅली, 11 मे रोजी कोईम्बतूरमध्ये रॅली,
6 / 9
तामिळनाडूमध्ये भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांना सांगतील की, जे लोक तीन भाषांच्या फॉर्म्युल्याच्या विरोधात आहेत, त्यांची मुले तीन भाषा शिकविल्या जाणाऱ्या शाळांमध्ये शिकत आहेत. तर गरीब मुले सरकारी शाळेत जातात. जिथे फक्त दोन भाषा शिकवल्या जातात. अशा परिस्थितीत गरीब मुलांनी दोनच भाषा का शिकाव्यात? सीबीएसई बोर्डाशी संलग्न असलेल्या राज्यातील द्रमुक नेत्यांनी चालवल्या जाणाऱ्या खासगी शाळांमध्ये तीन भाषांचा पर्याय आहे, हेही भाजप स्पष्ट सांगेल.
7 / 9
अलीकडच्या काळात भाजप आणि अण्णाद्रमुकमधील कटुता कमी होताना दिसत आहे. त्यामुळे भाजपनेही युतीबाबतची भूमिका मवाळ केली आहे. राज्यातील भाजप अध्यक्ष अन्नामलाई यांनी द्रमुकला राज्यातील सत्तेतून बेदखल करण्यासाठी AIADMK सोबतच्या संभाव्य युतीबाबत उदारता दाखवली आहे. AIADMK सरचिटणीस ई. पलानीस्वामी यांनीदेखील भाजपसोबत युतीची शक्यता नाकारली नाही.
8 / 9
सूत्रांवर विश्वास ठेवल्यास, एआयएडीएमकेने भाजपला संदेश पाठवला आहे की, युती करायची असेल, तर भाजप प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांना पदावरून हटवले जावे. दोन्ही पक्षांची युती सोपी करण्यासाठी भाजपदेखील प्रदेश नेतृत्वात बदल करण्याच्या विचारात आहे. याचे कारण म्हणजे, विद्यमान भाजप अध्यक्ष अण्णामलाई अण्णाद्रमुकसोबतच्या युतीच्या विरोधात आहेत. अशा स्थितीत भाजप राज्याची कमान तमिलीसाई सुंदरराजन किंवा नैना नागेंद्रन यांच्याकडे सोपवू शकते.
9 / 9
2026 च्या विधानसभा निवडणुकीत युतीमुळे सरकार स्थापन होण्याची शक्यता वाढेल, असे भाजपच्या हायकमांडला वाटते. भाजपच्या या आशेचे कारण म्हणजे, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूमध्ये भाजपचा वाढलेली मतांची टक्केवारी. 2019 च्या तुलनेत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी तीन पटीने वाढून 11.24 टक्के झाली. मतांची टक्केवारी वाढण्याचे एक कारण म्हणजे भाजपने 2019 मध्ये 5 आणि 2024 मध्ये 23 जागांवर निवडणूक लढवली. मात्र भाजप याकडे तामिळनाडूतील जनतेचा वाढता पाठिंबा म्हणून पाहत आहे.
टॅग्स :BJPभाजपाDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमAll India Anna Dravida Munnetra Kazhagamआॅल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगमTamilnaduतामिळनाडू