शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काळ्या गव्हाची कमाल; लाखोंच्या कमाईमुळे शेतकरी मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 10:55 AM

1 / 11
शेतकरी मातीतून सोनं पिकवतो, असं म्हणतात. मात्र अनेकदा जगाच्या पोशिंद्यावरच अन्याय होतो. त्याच्या पिकाला योग्य भावच मिळत नाही.
2 / 11
परंपारिक शेती पद्धतीमुळे अनेकदा शेतकरी अडचणीत येतो. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला येतो.
3 / 11
मध्य प्रदेशच्या एका शेतकऱ्यानं हटके शेती केली आहे. त्याला खर्चाच्या चौपट दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्याचं नशीबच पालटलं आहे.
4 / 11
धार जिल्ह्यातल्या सिरसौदामधील शेतकरी विनोद चौहान यांनी काळा गहू लावला. काळा गहू अतिशय दुर्मिळ समजला जातो. त्यामुळे चौहान यांनी लावलेल्या गव्हाला मोठी मागणी आहे.
5 / 11
विनोद चौहान यांनी ५ क्विंटल गहू लावला होता. त्यातून २०० क्विंटल गव्हाचं उत्पादन आलं.
6 / 11
काळा गहू अतिशय पौष्टिक असतो. यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं. मधुमेह, रक्तदाब, कर्करोगाचा सामना करणाऱ्यांसाठी हा गहू उत्तम समजला जातो.
7 / 11
काळा गहू लावण्यासाठी चौहान यांना २५ रुपये जास्त खर्च करावे लागले. त्यांनी साधारण गहू लावला असता, तर त्यांचे २५ हजार रुपये वाचले असते. मात्र चौहान यांनी जोखीम पत्करली.
8 / 11
काळ्या गव्हात अनेक औषधी गुण आहेत. त्यामुळेच त्यांच्या गव्हाला मोठी मागणी आहे.
9 / 11
विनोद चौहान यांच्या यशोगाथा ऐकून अनेकांनी त्यांना संपर्क केला. जवळपास १२ राज्यांतील शेतकऱ्यांनी त्यांना फोन करून काळा गहू लावण्याची इच्छा व्यक्त केली.
10 / 11
साधारण गव्हाला क्विंटलमागे २ हजार रुपयांचा दर मिळतो. तर काळ्या गव्हाला प्रति क्विंटलमागे ७ ते ८ हजार दर मिळतो.
11 / 11
काळ्या गव्हाची चव शरबती गव्हासारखीच असते. मात्र तो मधुमेहींसाठी अतिशय फायदेशीर असतो. त्यामुळे त्याला मोठी मागणी आहे.