शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

व्वा भाई व्वा! भावाने न सांगताच UPSC चा फॉर्म भरला; बहीण आयएएस झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 4:45 PM

1 / 10
दरवर्षी २४ मे रोजी ब्रदर्स डे साजरा केला जातो. आपल्या देशात एक आयएएस महिला आहे, जिच्यासाठी भावाने मोठी संधी उपलब्ध केली आणि तिनेही ती साधत आज या मुक्कामावर पोहोचली आहे. ही कहानी आहे युपीएससी टॉपर अनु कुमारी यांची. जर तिच्या भावाने तिला न सांगताच फॉर्म भरला नसता तर आज ती एवढ्या मोठ्या पदावर नसली असती.
2 / 10
अनु कुमारी यांनी २०१७ च्या युपीएससी बॅचमध्ये दुसरी रँक मिळविली होती. यासाठी त्यांना त्यांच्या भावाने प्रेरित केले होते.
3 / 10
खरेतर अनु या एका चांगल्या कंपनीत नोकरी करत होत्या. तिथे पगारही चांगला मिळत होता. लग्न झाल्यानंतरही त्या आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होत्या. मात्र, काही काळ गेल्यानंतर त्यांना असे वाटले की काहीतरी वेगळे कराय़ला हवे.
4 / 10
नोकरी असल्याने पैसे येत होते, पण रोजचे तेच काम करून कंटाळा येऊ लागला होता. अनु यांना वाटत होते की, सर्व आयुष्य एक्सेल फाई, प्रेझेंन्टेशन यातच जाणार आहे. आर्थिक गरजा पूर्ण होतायत पण मानसिक संतुष्टी मिळत नव्हती. यानंतर त्यांनी युपीएससीची परीक्षा देण्याचे ठरविले जे सोपे नव्हते.
5 / 10
युपीएससी ही एक कठीण परीक्षा आहे. यामुळे ती नोकरी करता करता पास करणे कठीणच होते. अनुला नोकरी सोडायची होती. मात्र, तिला ही गोष्ट कोणाला सांगता येत नव्हती.
6 / 10
अनु यांचे आयुष्यही सेट झालेले होते. मात्र, नोकरी सोडणे हा एक मोठा निर्णय होता. कारण नोकरी सोडून युपीएससीची तयारी करणे तेवढे सोपे नसते. त्याचबरोबर ही परीक्षा पास होण्याची काही गॅरंटीही नसते.
7 / 10
या विचारात २०१५ साल उजाडले. तेव्हा युपीएससीच्या निकालामध्ये टीना डाबी यांनी पहिला क्रमांक मिळविला होता. जेव्हा निकाल लागला तेव्हा अनुचा छोटा भाऊ पेपर वाचत होता. त्याने म्हटले की, एक दिवस अनु या जागी असेल. यानंतर भावाने तिला टोमणे मारायला सुरुवात केली. तू परीक्षा दे, असे तो त्य़ातून सांगत होता. मात्र, आता खूप वेळ निघून गेला असे म्हणत अनु त्याचे बोलणे टाळत होती.
8 / 10
पण भावाच्या मनात वेगळेच विचार सुरु होते. त्याने अनुला न सांगताच युपीएससीचा फॉर्म भरून टाकला होता. अनु याबाबत बराच काळ अनभिज्ञ होती. याचवेळी तिचा भाऊ नोकरी सोडून अभ्यास कर असे सांगू लागला होता.
9 / 10
अखेर त्याच्या या टोमणेबाजीला यश आले. अनुने नोकरी सोडून दिली आणि मामाच्या घरी जाऊन युपीएससीची तयारी करू लागली. या काळात तिने मुलालाही दूर ठेवले होते. तिला या साठी भावासह पती आणि कुटुंबाचा पाठिंबा मिळत होता.
10 / 10
झालं, २०१८ चा निकाल आला. अनुचा दुसरा नंबर आला होता. दुसऱ्याच दिवशी अनुचा फोटो पेपरमध्ये पाहून भावाला वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात आल्याचा आनंद झाला.
टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग