शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Budget 2022: ३ वर्षानंतर पुन्हा मोदी सरकार ‘सरप्राइज’ देणार?; रातोरात होऊ शकतात ‘हे’ मोठे बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 8:01 PM

1 / 10
पुढील २४ तासांत संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्राच्या नजरा सरकारच्या घोषणांकडे लागल्या आहेत. यात ऑटो इंडस्ट्रीचाही समावेश आहे. ज्याचा प्रभाव देशाच्या अर्थसंकल्पावर मोठ्या प्रमाणात पडतो.
2 / 10
ऑटो इंडस्ट्री लाखो रोजगार निर्माण होतात. त्यामुळे यंदाच्या बजेटमधून ऑटो क्षेत्राला खूप अपेक्षा आहेत. परंतु सरकार त्या अपेक्षा पूर्ण करणार की पुन्हा ३ वर्षापूर्वीसारखं बाजाराला हैराण करणार? अशात तुम्ही विचार करत असाल सरकार कोणतं पाऊल उचलेल. जे मोदींनी ३ वर्षापूर्वी उचललं होतं.
3 / 10
२०१९ ऑटो क्षेत्रात अनेक चढ-उतार राहिले. बाजाराला बजेटकडून अपेक्षा होती. सरकार वाहनांवरील GST कमी करेल अशी अपेक्षा होती. परंतु मोदी सरकारनं दुसराच काही विचार करुन ठेवला होता. २०१९ ला मोदी सरकारनं इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आश्वासनांचा पाऊस पाडला.
4 / 10
केंद्र सरकारनं इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरुन थेट ५ टक्क्यांवर आणली. त्याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांवरील व्याज भरण्यासाठी आयकरात दीड लाख रुपयांची अतिरिक्त सूट दिली. मोदी सरकारच्या या मास्टर स्ट्रोकनं इलेक्ट्रिक वाहनांचे दर एका झटक्यात उतरले.
5 / 10
इलेक्ट्रिक वाहनांवर ७ टक्के जीएसटी दर कमी केल्याचा परिणाम झाला. या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीत ऐतिहासिक घट पाहायला मिळाली. इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती १ लाखांहून अधिक कमी झाल्या. त्यामुळे बाजारात इलेक्ट्रिक वाहन घेण्यासाठी चालना मिळाली.
6 / 10
२०१९ मध्ये जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी कमी करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून या क्षेत्राकडे वेगाने सर्वांचे लक्ष गेले. इलेक्ट्रिक वाहनांसाठी सब्सिडी देण्याची सरकारची घोषणा हा ऐतिहासिक निर्णय ठरला.
7 / 10
त्यानंतर बाजारात इलेक्ट्रिक वाहनांचे दर कमी झाले. स्वस्तात मस्त, इंधनाचं टेन्शन नाही म्हणून ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे गेला. इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनाही चालना मिळाली. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे झाले.
8 / 10
मागील वर्षी जून महिन्यात केंद्र सरकारनं FAME II योजनेत बदल केले. त्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांवरील सब्सिडी १० हजारांवरुन वाढवून १५ हजारांपर्यंत केली. पहिल्याच्या तुलनेत सब्सिडी जास्त मिळत असल्याने देशात इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची विक्री वेगाने वाढली.
9 / 10
केंद्र सरकारकडून सातत्याने देशात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचं काम सुरु आहे. अशावेळी यंदाच्या बजेटमध्येही ईव्ही वाहनांवरील जीएसटी दरात कपात करावी अशी मागणी वाहन उत्पादकांची आहे. त्याशिवाय इलेक्ट्रिक कंमोनेंट्स किंमतीतही कर कपात करावी अशी बाजाराची मागणी आहे.
10 / 10
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातही मोदी सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचं ठरवलं आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये सब्सिडी अथवा करात सूट देण्याचा निर्णय घेतला. तर भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीत पुन्हा घट झाल्याची दिसून येईल. त्यामुळे या घोषणेकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022