शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Income Tax भरणाऱ्यांना लागणार लॉटरी; सरकार सर्वसामान्यांना देणार मोठं गिफ्ट?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 2:39 PM

1 / 6
आयकर(Income Tax) हा मध्यमवर्गापासून उच्च वर्गापर्यंत सर्वांसाठी आवश्यक कर आहे. ज्यामध्ये पुढील वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावेळी मोठा बदल करणार आहेत. तुम्हीही टॅक्स भरत असाल किंवा टॅक्स स्लॅबमध्ये येत असाल, तर केंद्र सरकार यावेळी टॅक्स स्लॅबमध्ये कोणते बदल करणार आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
2 / 6
सरकार १ फेब्रुवारी २०२३ रोजी अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करेल. यावेळी टॅक्सबाबत सरकारची काय योजना आहे जे आम्ही सांगणार आहोत. सध्या २.५० लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही, मात्र या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन ही मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहेत.
3 / 6
म्हणजेच या बदलानंतर तुमचे उत्पन्न ५ लाख रुपये असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. याआधी २०१४ मध्ये शेवटच्या वेळी आयकर मर्यादेत बदल करण्यात आला होता. त्यावेळी ही मर्यादा २ लाख होती, ती वाढवून २.५ लाख करण्यात आली.
4 / 6
या वेळी पुन्हा सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी बातमी देऊ शकते, अशी अपेक्षा आहे. २०२४ ला देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता सरकार वैयक्तिक कर सूट मर्यादा वाढविण्याचा विचार करतंय असं सांगण्यात येत आहे.
5 / 6
मोदी सरकार २०२३ मध्ये आपल्या दुसऱ्या टर्मचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. पुढील वर्षी अर्थसंकल्पाच्या सुमारे १३ महिन्यांनंतर सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने यावेळी सरकार सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्याची तयारी करत असल्याचे मानले जात आहे.
6 / 6
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करसंबंधित सूचना मागवल्या होत्या, नवीन कर प्रणालीमध्ये सुधारणांना किती वाव आहे. याबाबतही चर्चा सुरू आहे, त्यामुळे सरकार नव्या आणि जुन्या दोन्ही करप्रणालीत बदल करू शकते, असे मानले जात आहे. सध्या नवीन कर प्रणालीमध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा नाही.
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनElectionनिवडणूक