Bundelkhand's Strawberry Girl! gurlin chawla took Law degree in Pune, became star overnight
बुंदेलखंडची स्ट्रॉबेरी गर्ल! पुण्यात घेतले लॉचे शिक्षण, गुरलीन रातोरात स्टार बनली By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 3:59 PM1 / 10दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुंदेलखंडच्या स्ट्रॉबेरीचा मन की बातमध्ये उल्लेख केला होता. स्ट्रॉबेरी म्हटले की आपल्याला वाई, खंडाळा आठवते. पण उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंडमध्ये कसे शक्य आहे. हो आहे ना, कारण ते एका युवतीने करून दाखविले आहे. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शेतीतील प्रयोगाची स्तुती केली आहे. 2 / 10आता ही तरुणी स्ट्रॉबेरी गर्ल म्हणून सोशल मीडियात प्रसिद्ध झाली आहे. या स्ट्रॉबेरी गर्लचे नाव आहे गुरलीन चावला. 3 / 10गुरलीन ही उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये राहते. स्ट्रॉबेरीच्या शेतीने ती रातोरात स्टार झाली आहे. झाशीमध्ये स्ट्रॉबेरी फेस्टिव्हल सुरु झाला आहे. 4 / 1023 वर्षीय गुरलीन ही कायद्याची पदवीधर आहे. तीने पुण्यातून शिक्षण पूर्ण केले. गुरलीन सांगते की, शेती करेन असे कधी वाटले नव्हते. लॉकडाऊनमध्ये घरी आली होती. रिकामा वेळ असायचा. तेव्हा त्याचा काहीतरी फायदा करायचा विचार आला. मला गार्डनिंग खूप आवडते. यामुळे मी घरीच स्ट्रॉबेरीची काही रोपे लावली. थोड्याच दिवसांत त्याला स्ट्रॉबेरी धरू लागली. फळही चांगले चवदार होते. 5 / 10गुरलीनने स्ट्रॉबेरीची शेती ऑनलाईन शिकून घेतली. गार्डनमध्ये लावलेली रोपटी पाहून वडिलांनीही साथ दिली. याची मोठी लागवड केली पाहिजे असे ते गुरुलीनला म्हणाले. 6 / 10गुरुलीनकडे 4-5 एकर जागा होती. ऑक्टोबरमध्ये तीने 20 हजार स्ट्रॉबेरीची रोपे खरेदी केली. ती 1.5 एकरात लावली. डिसेंबरमध्ये त्याला स्ट्रॉबेरी लागली. 7 / 10जेव्हा फळ धरले तेव्हा लोकल बाजारात संपर्क साधला. त्यांना फळ आव़डले. विक्री सुरु झाली. आता आम्ही अनेक सुपर मार्केटना स्ट्रॉबेरी पुरवितोय. यासोबत आता गुरलीन अन्य़ भाज्यांचे पीकही घेऊ लागली आहे. 8 / 10गुरलीनने झांशी ऑर्गेनिक्स नावाची वेबसाईटही बनविली आहे. एकूण सात एकर जमिनीवर ती शेती करत आहे. दिवसाला तीने 70 किलो स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेते. 250 हून अधिक ऑर्डर येतात. यापैकी काही वेबसाईटवरूनही येतातय दिवसाला 30000 रुपयांची विक्री करत असल्याचे ती म्हणाली. 9 / 10गुरलीनला शेती व्यवसाय करताना पाचच महिने झाले आहेत. परंतू तिची दखल मोदींनीही घेतली आहे. मुख्यमंत्री य़ोगी आदित्यनाथ यांनीदेखील गुरलीनला झांशीच्या स्ट्रॉबेरी फेस्टिव्हलची ब्रँड अॅम्बेसिडर बनविले आहे. 10 / 10स्ट्रॉबेरीसाठी 30 अंशांपेक्षा कमी तापमान लागते. मात्र, बुंदेलखंडचे तापमान हे 35 पेक्षा जास्त आहे. तरीही गुरलीनने हिमतीच्या जोरावर स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications