शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Assembly Elections Opinion poll: बंगाल कुणाचा? आसाममध्ये भाजपला फटका! जाणून घ्या, कुठे कुणाचं येणार सरकार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 10:17 AM

1 / 11
देशातील पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांत आणि पुदुच्चेरी या केंद्र शासित प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसंदर्भात 'सी व्होटर्स'ने ओपिनियन पोल जारी केला आहे. या पाच राज्यांचा निवडणूक निकाल 2 मेरोजी जाहीर केला जाणार आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी जनतेचा कौल कुणाकडे आहे? हे जाणून घेण्यासाठी सी व्होटरने सर्व्हे केला आहे.
2 / 11
सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार, पश्चिम बंगालमरध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा टीएमसीचे सरकार स्थापन होऊ शकते. मात्र, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांना फटका बसणार आहे. तर, भाजपला बंगालची सत्ता मिळविण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. मात्र, येथे भाजपच्या जागा वाढत असल्याचे दिसत आहे.
3 / 11
पश्चिम बंगाल- 292 जागा - टीएमसी - 152 ते 168 जागा, भाजप - 104 ते 120 जागा, काँग्रेस+लेफ्ट- 18 ते 26 जागा, इतर - 0 ते 2 जागा,
4 / 11
तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या 234 जागांसाठी निवडणूक होत आहे. यांपैकी युपीएला 173 ते 181 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यूपीएच्या 79 जागा वाढण्याचा अंदाज आहे. तर एनडीएला 2016 च्या तुलनेत 87 जागांवर नुकसान होण्याचा अंदाज आहे. येथे यावेळी एनडीएला केवळ 45 ते 53 जागाच मिळण्याचा अंदाज आहे. 2016मध्य हा आकडा 136 एवढा होता.
5 / 11
तमिळनाडू - 234 जागा - यूपीए (डीएमके+काँग्रेस+इतर) - 173 ते 181, एनडीए (एआईएडीएमके+भाजप+इतर)- 45 ते 53, एमएनएम - 1 ते 5, एएमएमके - 1 ते 5, इतर - 0 ते चार.
6 / 11
केरळमध्ये पुन्हा एकदा एलडीएफचे सरकार बनताना दिसत आहे. एलडीएफला 71 ते 83 जागा मिळण्याचा अनुमान आहे. तर यूडीएफला 56 ते 68 जागा मिळू शकतात. तर भाजपला 0 ते 2 जागा मिळू शकतात.
7 / 11
केरळ - 140 जागा - एलडीएफ- 71 ते 83 जागा, यूडीएफ- 56 ते 68 जागा, भाजप - 0 ते 2 जागा, इतर - 0 जागा.
8 / 11
आसाममध्ये पुन्हा एकदा एनडीए सत्तेत येऊ शकते. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 63 आहे. येथे एनडीएला 65 ते 73 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला 52 ते 60 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
9 / 11
आसाम - 126 जागा - एनडीए- 65 ते 73 जागा, यूपीए- 52 ते 60 जागा, इतर - 0 ते 4 जागा.
10 / 11
पुदुच्चेरीत एनडीएला 30 पैकी 19 ते 23 जागा मिळू शकतात. तर यूपीएला (काँग्रेस आणि डीएमके) 7 ते 9 जागा मिळू शकतात. येथे 6 एप्रिलला मतदान होणार आहे.
11 / 11
यूपीए (काँग्रेस-डीएमके)- 7 ते 11, एनडीए (आयएनआरसी+भाजप+एआयएडीएमके)- 19 ते 23 इतर- 0 ते 1.
टॅग्स :ElectionनिवडणूकWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाcongressकाँग्रेसTrinamool Congressतृणमूल काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिका