This is called photoshoot, the striking difference between Modi and Yogi viral photos
याला म्हणतात फोटोशूट, मोदी-योगींच्या फोटोतील 'लक्षवेधी फरक' By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 1:24 PM1 / 10देशातील 5 राज्यात पुढील वर्षी निवडणुका होत असून उत्तर प्रदेश विधानसभेचीही निवडणूक होत आहे. सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी जय्यत तयारी करत आहेत. 2 / 10 तत्पूर्वी एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय. हा फोटो मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 3 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री योगीं आदित्यनाथ यांच्या खांद्यावर हात ठेवून चर्चा करताना फोटोमध्ये दिसत आहेत. स्वतः योगी यांनी एका कवितेसह हे फोटो ट्विट केले आहेत.4 / 10मोदी-योगींच्या या फोटोवरुन नेटीझन्सने हे फोटोशूट असल्याचं म्हटलंय. तसेच, योगींनी शेअर केलेल्या दोन फोटोमधील फरकही काहींनी निदर्शनास आणून दिलाय. 5 / 10मोदी आणि योगी यांच्यातील दोन फोटोपैकी एका फोटोमध्ये मोदींच्या खांद्यावर शॉल दिसते. तर, दुसऱ्या फोटोतून ही शाल गायब असल्याचं काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी म्हटलंय. 6 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदी 56व्या DGP IGP परिषदेला उपस्थित राहण्यासाठी तीन दिवसांच्या लखनऊ दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. 7 / 10या भेटीदरम्यान सीएम योगींनी शेअर केलेला फोटो बरचं काही बोलून जातोय. या नेत्यांमधील मजबूत संबंध दाखवण्यासाठी दोन्ही फोटो पुरेशी आहेत. सीएम योगींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत.8 / 10 मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी हे फोटो शेअर करत एक कविता लिहिली असून त्याद्वारे त्यांनी आपले मतही मांडले आहे9 / 10त्यांनी लिहिलं- ‘हम निकल पड़े हैं प्रण करके, अपना तन-मन अर्पण करके, जिद है एक सूर्य उगाना है, अम्बर से ऊंचा जाना है, एक भारत नया बनाना है.’10 / 10दरम्यान, हा फोटो म्हणजे फोटोशूटचा उत्तम नमूना असल्याचं काहींनी ट्विटरवरुन म्हटलंय. तसेच, दोन फोटोमधील लक्षवेधी फरकही अनेकांनी सांगितलाय आणखी वाचा Subscribe to Notifications