Can currency notes are carriers of covid virus cait sought clarification from the government
चलनी नोटांमुळे देशात कोरोना व्हायरस पसरतोय का?; CAIT नं मागितलं केंद्राकडे स्पष्टीकरण By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 10:36 AM1 / 10कोरोना व्हायरसने जगभरात खळबळ उडाली आहे. कोरोना संसर्ग एका व्यक्तीपासून दुसर्या व्यक्तीपर्यंत पसरतो. अशा परिस्थितीत प्रत्येकजण अन-टच गोष्टी सुविधा वापरणं योग्य समजत आहेत.2 / 10परंतु चलनी नोट जी एका हातातून दुसरीकडे जाते, तेथे संसर्ग पसरण्याचा धोका असतो. डिजिटल ट्रान्झॅक्शनचा वाढता ट्रेंड असूनही अजूनही मोठ्या संख्येने लोक रोख नोटांमध्ये व्यवहार करतात. सर्वात मोठा धोका व्यापारांना आहे. 3 / 10त्यामुळे व्यापा-यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला चलनी नोटांनी कोरोनाचा संसर्ग पसरतो की नाही हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे. या माहितीसाठी कॅटने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांना पत्र लिहिले आहे. 4 / 10या पत्रात केंद्र सरकारला असे विचारण्यात आले आहे की जर नोटांद्वारे संक्रमण पसरत असेल तर ते टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील. आज बर्याच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील अहवालांमध्ये असे दिसून येत आहे की कागदाच्या नोटांमधून व्हायरसचा संसर्ग पसरतो.5 / 10कॅटचे अध्यक्ष बी.सी. भारतीया आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सन २०१५ मध्ये किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी, लखनऊच्या अहवालाचा हवाला देऊन म्हटले आहे की, नोटा आणि नाण्यांद्वारे विषाणू, बुरशी आणि बॅक्टेरिया पसरतात. 6 / 10२०१६ मध्ये तामिळनाडूमध्ये केलेल्या अभ्यासात असे आढळले आहे की ८६.४ टक्के चलनी नोटा बर्याच आजारांना पसरवत आहेत. या नोटा डॉक्टर, बँक, बाजार, कत्तलखाने, विद्यार्थी आणि गृहिणींकडून गोळा करण्यात आल्या. 7 / 10सन २०१६ मध्ये कर्नाटकात झालेल्या आणखी एका अभ्यासानुसार १००,५०, २० आणि १० रुपयांच्या १०० नोटांपैकी ५८ नोटा संक्रमित झाल्या.8 / 10आरबीआयने मार्च २०१९ पर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २१,१०,८९२ लाख कोटी रुपये बँक नोट चलनात होते आणि मार्च २०२० पर्यंत ती वाढून २४,२०,९७५ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. म्हणजेच, एका वर्षात सुमारे १५ टक्क्यांनी वाढली 9 / 10दरम्यान, देशात सापडणाऱ्या कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी जगभरात सापडलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी तब्बल ४० टक्के रुग्ण भारतातील होते. भारतानंतर सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या अमेरिका आणि ब्राझील देशांत सापडलेल्या नव्या रुग्णांची एकत्रित संख्याही भारतापेक्षा कमी आहे.10 / 10सोमवारी देशात सापडलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटून ७४ हजार ९६० होती. सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून ११२५ झाली. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ७२ हजार ७२५ जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications