शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राजधानी दिल्ली प्रदुषणाच्या विळख्यात; नागरिकांचं आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 12:55 PM

1 / 5
दिल्लीत प्रदुषणाने कमाल पातळीही ओलांडली असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. दिल्लीतील वायू प्रदुषणाच्या पातळीमध्ये गेल्या तीन वर्षातील उच्चांकी नोंदवण्यात आली आहे
2 / 5
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार दिल्लीत २४ तासांतील हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) रविवारी दुपारी चार वाजता ४९४ इतका म्हणजेच अतिगंभीर (सीव्हिअर प्लस) होता. या पूर्वी ६ नोव्हेंबर, २०१६ रोजी हा निर्देशांक ४९७ होता.
3 / 5
अतिधोकादायक प्रदूषणाची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल कॅपिटल रिजनमध्ये (एनसीआर) कोणतीही बांधकामे करण्यावर बंदी घातली आहे. न्यायालयाकडून पुढील आदेश मिळेपर्यंत ही बंदी कायम राहिल. तरीही बांधकामे सुरू ठेवणाऱ्यांना १ लाख व कचरा जाळणाऱ्यांना पाच हजारांचा दंड आकारण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
4 / 5
दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी तिथे वाहनांकरिता अरविंद केजरीवाल सरकारने सम-विषम योजना सोमवारपासून लागू केली.
5 / 5
दिवाळीत दिल्लीत फटाके उडवण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यामधून बाहेर पडणारा धूर वायू प्रदूषण वाढण्यास कारण ठरत आहे. याशिवाय, हरयाणा व पंजाबमध्ये दरवर्षीप्रमाणेच पिकांचे अवशेष जाळण्यातूनही प्रदूषण होत आहे.
टॅग्स :delhiदिल्लीpollutionप्रदूषण