शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Car Modifications:कारमध्ये हे चार मॉडिफिकेशन करणे पडू शकते महागात, भरावा लागू शकतो जबर दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 5:19 PM

1 / 5
अनेक जणांना त्यांच्या कारमध्ये मॉडिफिकेशन करायला आवडते. मात्र अनेक मॉडिफिकेशन असे असतात जे तुम्हाला महागात पडू शकता. कारण भारतामध्ये असे मॉडिफिकेशन करणे हे संपूर्णपणे बेकायदेशीर मानण्यात आलेले आहे. जर तुम्ही तुमच्या कारमध्ये असं कुठलंही मॉडिफिकेशन केलं असेल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला त्या चार मॉडिफिकेशनबाबत सांगणार आहोत, जे करणे टाळले पाहिजे. अन्यथा दंड होणे निश्चित आहे.
2 / 5
काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतामध्ये कारच्या काचांना टिंट करता येत असे. मात्र गेल्या काही काळापासून वाढत असलेली गुन्हेगारी विचारात घेऊन नियमामध्ये बदल करण्यात आला आहे. आता कारच्या काचांना टिंटेड करणं बेकायदेशीर ठरवण्यात आलं आहे. जर कुठल्याही कारच्या काचा टिंटेड मिळाल्यास पोलीस दंडात्मक कारवाई करू शकतात.
3 / 5
मॉडिफाइड स्टियरिंग लावल्यासही दंडात्मक कारवाई होऊ शकते. असं स्टियरिंग लावणं हे बेकायदेशीर मानलं गेलं आहे. कारण स्टॉक स्टियरिंगमध्ये एअर बॅग्स असतात. तर मॉडिफाइड स्टियरिंगमध्ये एअर बॅग्स नसतात. त्यामुळे तुमची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. तसेच अपघातादरम्यान, जीवघेणी जखम होऊ शकते.
4 / 5
जर तुम्ही तुमच्या कारच्या ओरिजनल कलरला लपवून त्यावर अन्य कुठल्या कलरचा कोट चढवला, तर वेळीच सावध व्हा. असं काही पाहिल्यास पोलीस तुम्हाला त्वरित अडवतील. तसेच तुमच्यावर दंडात्मक कारवाई करतील. कारच्या ओरिजनल कलरसोबत छेडछाड करता कामा नये.
5 / 5
जर तुम्ही तुमच्या कारमध्ये आफ्टर मार्केट ग्रिल केजिंग लावलं असेल तर ते अपघातादरम्यान धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अनेकदा कारच्या एअर बॅग्स उघडत नाहीत. त्यामुळे अपघातादरम्यान, तुम्हाला गंभीर जखमा होऊ शकतात. ही बाब विचारात घेऊनच हेवी ग्रिल केज लावल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.
टॅग्स :carकारTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस