शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 4:34 PM

1 / 7
सीबीआयने आरजी कार बलात्कार-हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. मुख्य आरोपी संजय रॉय याच्याविरुद्ध सियालदह न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने गँगरेपची शक्यता फेटाळून लावली आहे. रॉयने एकट्यानेच गुन्हा केल्याचे यावरून दिसून येते.
2 / 7
सीबीआयने आरोपी संजय रॉय याला मुख्य आरोपी बनवला आहे. या प्रकरणी २०० जणांचे जबाब घेण्यात आले आहेत.
3 / 7
या प्रकरणी कनिष्ठ डॉक्टर आमरण उपोषणाला बसले होते. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करत नसल्याने त्यांना आता आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे, असं उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
4 / 7
गेल्या शुक्रवारी धर्मतळा येथील डोरिना क्रॉसिंगवर कनिष्ठ डॉक्टर उपोषणासाठी बसले होते. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी पश्चिम बंगाल सरकारला २४ तासांचा वेळ दिला होता.
5 / 7
याबाबत एका कनिष्ठ डॉक्टरने सांगितले की, राज्य सरकारने दिलेल्या मुदतीत त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे आमच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आणि पारदर्शकता यावी यासाठी आम्ही उपोषण सुरू करत आहे.
6 / 7
या प्रकरणावरुन भारतीय जनता पक्ष ममता बॅनर्जींवर हल्लाबोल करत आहे. या प्रकरणामुळे पश्चिम बंगाल सरकारवर केस हलकी करणे, पुरावे लपवणे असे अनेक आरोप होत आहेत.
7 / 7
या प्रकरणामुळे अनेक डॉक्टरांनी ड्युटीवर जाणे बंद केले होते, परंतु अनेक प्रयत्नांनंतर आणि परिस्थितीचा विचार करून आता डॉक्टर ड्युटीवर जाऊ लागले आहेत.
टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागkolkata-uttar-pcकोलकाता उत्तरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय