शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोहन भागवतांना ASL तर शरद पवारांना Z प्लस संरक्षण; दोन्ही सुरक्षेत नेमका फरक काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 1:08 PM

1 / 10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची सुरक्षा झेड प्लसवरून वाढवून झेड प्लस ASL अशी केली आहे. आता त्यांच्या सुरक्षेत आणखी विशेष बंदोबस्त असणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना केंद्राने झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
2 / 10
मोहन भागवत आणि शरद पवार यांच्या दोघांची सुरक्षा झेड प्लसच आहे. परंतु त्यात खूप अंतर आहे. त्यामुळे झेड प्लस ASL सुरक्षा आणि झेड प्लस सुरक्षा यात काय फरक आहे आणि दोघांमध्ये कशारितीने सुरक्षित कवच दिले जाते हे जाणून घेऊया.
3 / 10
भारत सरकारकडून देशातील काही नेत्यांना सुरक्षा दिली जाते. मुख्यत: केंद्रीय गृह मंत्रालयाकडून X, Y, Y Plus, Z, Z Plus सुरक्षा पुरवली जाते. त्याशिवाय एक एसपीजी सुरक्षा असते जी देशाच्या पंतप्रधानांना मिळते. एसपीजी एक वेगळी सुरक्षा असते जी केवळ पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी वापरली जाते.
4 / 10
एसपीजी सुरक्षेखालोखाल झेड प्लस सुरक्षेचा नंबर येतो. प्रत्येक सुरक्षा प्रवर्गात जवानांची संख्या आणि सुरक्षेच्या प्रोटोकॉलची माहिती असते. झेड प्लस सुरक्षेतही अनेक कॅटेगिरी आहेत त्यात विविध कॅटेगिरीनुसार सुरक्षा पुरवली जाते. झेड प्लस सुरक्षेत झेड प्लस कवर, झेड प्लससह एनएसजी कवर आणि झेड प्लस ASL सुरक्षेचा समावेश आहे.
5 / 10
काय असते ASL कवर? - जर एएसएल कवरबाबत बोलायचं झालं, तर झेड प्लस सुरक्षेत ही खास व्यवस्था असते. ही पंतप्रधानांच्या एसपीजी सुरक्षेसारखीच असते, त्यात काही प्रोटोकॉल पीएम सुरक्षेसारखे असतात. म्हणजे पंतप्रधानांच्या सुरक्षेत जे नियम असतात तसेच नियम एएसएल कवर सुरक्षेतही दिले जाते.
6 / 10
एएसएल म्हणजे एडवान्स सिक्युरिटी लाइजन, या सुरक्षा व्यवस्थेत केवळ ही त्या व्यक्तीसोबत सुरक्षा नसते तर ज्यांना ही सुरक्षा दिली जाते. ते कुठल्या दौऱ्यावर अथवा ठिकाणी जात असतील तर त्या व्यक्तीच्या आधी ही सुरक्षा व्यवस्था संबंधित ठिकाणी सुरक्षा व्यवस्था सांभाळते.
7 / 10
ही व्यवस्था सुरक्षा स्थळाचा आढावा घेते, त्याठिकाणी कोणकोणती व्यवस्था आहे ते पाहते. त्यात एक एक्झिट प्लॅनही बनवला जातो. ज्यात या व्यक्तीच्या प्रवेशाची, बाहेर निघायची आणि त्याठिकाणी येणाऱ्या लोकांची सर्वकाही माहिती जमा केली जाते त्या हिशोबाने हा प्लॅन तयार केला जातो.
8 / 10
जाण्या येण्याचा मार्गही सुरक्षित केला जातो. भारतात ही सुरक्षा काहीच जणांना आहे. त्यात गृहमंत्र्यांचा समावेश आहे. या सुरक्षा व्यवस्थेत गुप्तचर यंत्रणेचाही सहभाग असतो. त्यांच्यासोबत मिळून संबंधितांना योग्य सुरक्षा दिली जाते.
9 / 10
झेड प्लस एनएसजी कवर - झेड प्लस सुरक्षेत एक एनएसजी कवरही असते. एनएसजी कवरचा अर्थ त्यात एनएसजी कमांडोंचा समावेश असतो. सुरक्षाप्राप्त व्यक्तीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची सुरक्षा एनएसजी करते. एनएसजी कमांडो संबंधितांच्या घरी सुरक्षा देत नाही परंतु कुठल्याही अनपेक्षित घटनेतून त्यांना वाचवण्याचं काम करते.
10 / 10
फक्त झेड प्लस सुरक्षेत काय असते? जर झेड प्लस सुरक्षेबाबत सांगायचे झाले तर यात अनेक जवान सुरक्षा देतात. जवळपास ३६ जवान सुरक्षेत तैनात असतात त्यात काही एनएसजी, काही सीआरपीएफ अन्य जवानही असतात. झेड प्लस सुरक्षेत राज्य पोलीस दलातील जवानही असतात. शरद पवारांना केंद्राकडून झेड प्लस ही सुरक्षा देण्यात आली आहे.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMohan Bhagwatमोहन भागवतNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहHome Ministryगृह मंत्रालय