शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नवीन संसद भवनाचे फोटो आले समोर; पाहा कसं दिसतं लोकशाहीचे भव्यदिव्य मंदिर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 9:18 AM

1 / 10
देशाचं नवीन संसद भवन बनून तयार झाले आहे. या नव्या वास्तूचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी केले जाणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी झाली आहे. आमंत्रणही पाठवले आहेत. आता नवीन संसद भवनाचे आकर्षक फोटो समोर आलेत.
2 / 10
नवीन संसद भवन हे अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज आहे. त्रिकोण आकारात बनवलेल्या नव्या संसद भवनाच्या वास्तूची भव्यता पाहून लोकांचे डोळे चमकतील. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातंर्गत या नवीन संसद भवनाच्या वास्तूचे बांधकाम करण्यात आले.
3 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर २०२० मध्ये या वास्तूचे भूमिपूजन केले होते. टाटा प्रॉजेक्ट्स लि. यांनी नवीन संसद भवनाची वास्तू उभारली आहे. या वास्तूचे आर्किटेक्ट बिमल पटेल यांनी डिझाईन केलंय. बिमल पटेल हे गुजरातच्या अहमदाबाद शहरातून येतात. याआधीही त्यांनी अनेक प्रमुख इमारतींचे डिझाईन केलंय.
4 / 10
भारताच्या लोकशाहीचा वारसा दाखवण्यासाठी या इमारतीमध्ये एक भव्य संविधान सभागृह बांधण्यात आले आहे. नवीन संसद भवनात संसद सदस्यांसाठी एक विश्रामगृह, एक लायब्ररी, अनेक समिती खोल्या, जेवणाचे क्षेत्र आणि पुरेशी पार्किंगची जागा आहे. प्रकल्प पूर्ण करण्याची अंतिम मुदत नोव्हेंबर २०२२ होती, परंतु ती आता तयार आहे.
5 / 10
संसदेतील दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक झाल्यास एकावेळी १,२८० खासदार बसू शकतील. विद्यमान संसद भवनात लोकसभेतील ५५० आणि राज्यसभेतील २४० सदस्यांसाठी आसनव्यवस्था आहे. सध्याचे संसद भवन १९२७ मध्ये बनवण्यात आले होते.
6 / 10
नवीन संसद भवनाचे तीन मुख्य दरवाजे आहेत. ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार. VIP, खासदार आणि अभ्यागतांची एंट्री वेगवेगळ्या गेटमधून असेल. नवीन संसद भवनात ८८८ लोकसभा आणि ३०० राज्यसभा खासदारांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
7 / 10
त्रिकोणाच्या आकारात बांधलेली नवीन संसद भवन चार मजली आहे. हा संपूर्ण परिसर ६४,५०० चौरस मीटर क्षेत्रात पसरलेला आहे. त्याची किंमत ८६२ कोटी रुपये आहे. नवीन इमारतीत भारतीय लोकशाहीचा वारसा दाखवणारे संविधान सभागृह आहे.
8 / 10
नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा २८ मे रोजी आहे. संसद भवनाच्या उद्घाटनासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. दिवसभर चालणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाचा संपूर्ण आराखडाही समोर आला आहे. रिपोर्टनुसार, कार्यक्रम सकाळी ७.३० वाजता सुरू होईल आणि शेवटी पंतप्रधान मोदी संबोधित करतील.
9 / 10
१८ मे रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या इमारतीच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण पाठवले होते. त्यानंतर विरोधकांनी विरोध करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवीन संसद भवन इमारतीचे उद्घाटन व्हावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
10 / 10
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या नव्या संसद भवनाच्या उभारणीसाठी सरकारने निविदा मागवल्या. टाटा समूहाने लार्सन अँड टुब्रोला मागे टाकत बोली जिंकली. नव्या संसद भवनाच्या उभारणीच्या कामासाठी टाटा समूहाने ८६१ कोटी रुपयांची बोली लावली होती.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद