शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुरुंगात होते चंद्राबाबू नायडू, मुलावरही होतं संकट, TDPच्या विजयातील महत्त्वाची व्यक्ती 'ब्राह्मणी' कोण माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 3:28 PM

1 / 10
तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू १२ जून रोजी विजयवाडा येथे आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ७४ वर्षीय नायडू चौथ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. तेलुगू देसम-जनसेना-भाजप युतीनं १७५ सदस्यांच्या विधानसभेत १६४ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. त्यांनी लोकसभेच्या २५ पैकी २१ जागा जिंकल्या. एकट्या टीडीपीने विधानसभेच्या १३५ आणि लोकसभेच्या १६ जागा जिंकल्या.
2 / 10
चंद्राबाबू नायडू यांनी केवळ विधानसभा निवडणुकीतच विजय मिळवला नाही तर लोकसभेच्या जागेतही चांगली आघाडी मिळवली आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या विजयाचं श्रेय त्यांचे त्यांचे पुत्र नारा लोकेश यांना जाते. दरम्यान, पडद्यामागेही एक व्यक्ती काम करत होती. चंद्राबाबू नायडू यांच्या विजयात जर कोणी महत्त्वाची भूमिका बजावली असेल तर ती म्हणजे नारा लोकेश यांच्या पत्नी ब्राम्हणी. चंद्राबाबू तुरुंगात असताना आणि पतीवर अटकेची टांगती तलवार असताना ब्राह्मणी नारा यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.
3 / 10
चंद्राबाबू नायडू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तत्कालीन जगनमोहन रेड्डी सरकारनं त्यांना तुरुंगात टाकलं. चंद्राबाबू नायडू तुरुंगात जाताच आगामी निवडणुकांवर वाईट परिणाम झाला. नारा लोकेश यांनी पदभार स्वीकारला आणि आक्रमक भूमिका स्वीकारली. पण त्यांच्यावर अटकेची टांगती टांगती तलवार लटकली. त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला.
4 / 10
चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबावर मोठं संकट आलं. कुटुंबाची विश्वासार्हता वाचवण्यासाठी ब्राह्मणी या मैदानात उतरल्या. पक्षाच्या नेत्यांना सोबत घेऊन ब्राह्मणी यांनी जबाबदारी सांभाळली. मुलाला घरी सोडून त्या सकाळी निघायच्या आणि रात्री उशीरा घरी पोहोचायच्या. या काळात ब्राह्मणांनी पदयात्रा, रोड शो, जनसंपर्क आदी कार्यक्रमात सहभाग घेतला.
5 / 10
ब्राह्मणी यांनीही जगनमोहन सरकारविरोधात धरणे आंदोलन केलं. अनोखी कामगिरी केली. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारला इशारा दिला. त्यांनी पक्षाचं कामही सुरूच ठेवलं. विशेष म्हणजे ब्राह्मणी यांनी राजकारणात प्रथमच प्रवेश केला. त्याआधी त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. एका फिल्मी कुटुंबात जन्मलेल्या ब्राह्मणी नायडू कुटुंबाचा व्यवसाय सांभाळतात, पण सासरे आणि पतीच्या अनुपस्थितीत त्यांनी ज्या प्रकारे राजकीय सूत्रं हाती घेतली, त्यामुळे सर्वांनी त्यांचं कौतुक केलं.
6 / 10
ब्राह्मणी ज्या प्रकारे प्रचारात उतरल्या, त्यावरून त्यांचं सर्वत्र कौतुक झालं. भूक लागली तर त्या पक्षाच्या नेत्यांसोबत पायी जात असत, स्ट्रीट फूड खात असत. शेतात जाऊन शेतकऱ्यांशी बोलण्यापासून ते रस्त्याच्या कडेला छोटी दुकानं चालवणाऱ्यांपर्यंत सर्वांना त्या भेटल्या. प्रत्येक कार्यक्रमात ब्राह्मणींचा सहभाग होता. त्या रात्री जेमतेम २-३ तास झोपत होत्या. रात्री प्रचार संपल्यानंतर त्या दुसऱ्या दिवसाची रणनीती आखायच्या.
7 / 10
चंद्राबाबू नायडू यांना आंध्र प्रदेश कौशल्य विकास प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरून ९ सप्टेंबर २०२३ रोजी अटक करण्यात आली होती. राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात त्यांनी ५३ दिवस घालवले. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयानं चंद्राबाबू नायडू यांना ३१ ऑक्टोबर रोजी तात्पुरता जामीन मंजूर केला. ज्यानंतर ते बाहेर आला. ब्राह्मणी यांच्या पतीचीही तुरुंगातून सुटका झाली.
8 / 10
पती आणि सासरे तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी ब्राह्मणी यांचं काम पाहून जबाबदाऱ्या दिल्या. तेलुगू देसम पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस नारा लोकेश यांच्या पत्नी नारा ब्राह्मणी मंगलागिरी येथे होत्या. पती नारा लोकेश यांच्यावतीने त्यांनी मतदारांशी संवाद साधला. ब्राम्हणी यांनी विविध लोकांना भेटून सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने अपडेट्स शेअर केल्या.
9 / 10
२०१९ च्या निवडणुकीत लोकेश यांना मंगळागिरीतून पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. वायएसआर काँग्रेसचे अल्ला रामकृष्ण रेड्डी यांनी त्यांचा ५,३३७ मतांनी पराभव केला. यावेळी त्यांची थेट लढत वायएसआरसीपीच्या मुरुगुडू लावण्या यांच्याशी होती. नारा लोकेश यांनी आपल्या पत्नीकडे याची धुरा सोपवली आणि त्यांनी पतीच्या विजयाची पटकथा लिहिली.
10 / 10
ब्राह्मणी या चंद्राबाबू नायडू यांचे मेहुणे आणि टॉलिवूड अभिनेते एन. बालकृष्ण यांच्या कन्या आहेत. टीडीपीची स्थापना एन बालकृष्ण यांचे वडील एनटी रामाराव यांनी केली होती. ब्राह्मणी आणि नारा लोकेश यांचा विवाह २००७ मध्ये झाला होता. दोघांना देवांश नावाचा हा मुलगा आहे. लग्नापूर्वी ब्राह्मणी सिंगापूरमधील एका कॅपिटल व्हेंचर फर्ममध्ये काम करत होत्या. सध्या त्या नायडू कुटुंबाचा हेरिटेज फूड्स हा व्यवसाय सांभाळतात. त्यांनी स्टॅनफोर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केलं आहे
टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडू