chandrayaan 3 completes all lunar bound manoeuvres propulsion lander modules separate soon isro
Chandrayaan-3 : चंद्राच्या जवळ पोहोचले चंद्रयान, लँडर पुढील प्रवासासाठी तयार होईल By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 10:57 AM1 / 11भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम चंद्रयान-३ चंद्राच्या जवळ पोहोचली असून, त्याने चंद्राच्या दिशेने आणखी एक प्रदक्षिणा यशस्वीपणे पूर्ण केली आहे.2 / 11यानंतर लँडरला चंद्रयानपासून वेगळे करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. इस्रोने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.3 / 11ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, आज इंजिन यशस्वीरित्या चालू केल्यानंतर त्याने चंद्राच्या दिशेने जाणारी एक कक्षा पूर्ण केली आहे. आता त्याचे अंतर 153 किमी x 163 किमी राहिले आहे. 4 / 11येथून लँडर वेगळे केले जाईल आणि 17 ऑगस्टपासून आणखी एक फेरी पूर्ण केल्यानंतर या मिशनच्या कारकिर्दीचा स्वतंत्र प्रवास सुरू होईल. सर्व काही ठीक राहिल्यास, लँडर त्याच्या वेळापत्रकानुसार 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल.5 / 11जर हे मिशन यशस्वीरित्या पूर्ण झाले तर भारत हा पराक्रम करणारा जगातील चौथा देश बनेल. इतकेच नाही तर कोणत्याही अवजड रॉकेटशिवाय हे मिशन पूर्ण करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार आहे. 6 / 11याशिवाय, भारताच्या खात्यात आणखी एक यश येणार आहे, ज्यानुसार कमीत कमी खर्चात हे अभियान राबविणाऱ्या देशांपैकी भारत एक असेल.7 / 11देशवासीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या चंद्रयान-३च्या प्रक्षेपणासाठी बाहुबली रॉकेट म्हणजेच लॉन्च व्हेईकल मार्क-३ (एलव्हीएम-३) आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा केंद्रावरुन १४ जुलै रोजी लाँच झाले.8 / 11चंद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर जगभरातून भारताला शुभेच्छा दिल्या जात आहेत. जपान, ब्रिटनसह चीनच्याही अंतराळ संस्थेने भारताला शुभेच्छा दिल्या आहेत.9 / 11इस्रोच्या म्हणण्यानुसार, चंद्रयान-3 आता चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ पोहोचले आहे. हे सध्या 174 किमी x 1437 किमीच्या कक्षेत चंद्राभोवती फिरत आहे.10 / 1114 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 ते 12.30 दरम्यान चंद्रयान-3 चंद्राच्या खालच्या कक्षेत पाठवले . यासाठी बेंगळुरूमध्ये बसलेले इस्रोच्या शास्त्रज्ञांनी काम केले..11 / 11भारताने 14 जुलै रोजी चांद्रयान-3 लाँच केले, जे 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. आणखी वाचा Subscribe to Notifications