शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चंद्रावर आहे एक खास 'चीज'..! केवळ 50 ग्रॅममध्ये UP सारख्या बड्या राज्यालाही महिनाभर मिळेल वीज!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 9:21 PM

1 / 9
भारताने चांद्रयान-3 यशस्वीपणे लॉन्च करून इतिहास रचला आहे. याच बरोबर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिला देशही ठरला आहे. चंद्रयानाच्या रोव्हर ‘प्रज्ञान’ने चंद्रावर सल्फर, ऑक्सिजन, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, आयर्न, क्रोमियम आणि टायटॅनियम यांसारख्या गोष्टी शोधल्या आहेत.
2 / 9
मात्र, चंद्रावर एक अशी गोष्ट अशीही आहे, जिच्या केवळ 50 ग्रॅममध्ये उत्तर प्रदेश सारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्याला संपूर्ण महिनाभर ऊर्जा मिळू शकते. एवढेच नाही, तर 30 टनात संपूर्ण देशाला वर्षभर ऊर्जा मिळू शकते. या खास गोष्टीचे नाव आहे हेलियम-3.
3 / 9
वैज्ञानिकांच्या मते, Helium 3, हे हेलियमचे एक स्टेबल आयसोटॉप आहे, यात न्यूट्रॉनच्या तुलनेत प्रोटॉन अधिक आढळतात.
4 / 9
चीनचे स्पेसक्राफ्ट Change ने चंद्राच्या पृष्ठभागावरून मातीही आणली होती. यात हेलियम-3 आढळून आले होते. वैज्ञानिकांच्या मते, केवळ एक ग्रॅम हेलियम-3, 165 मेगावॅट आवर्सची वीज निर्माण करू शकते.
5 / 9
महत्वाचे म्हणजे, हेलियम 3, क्लीन एनर्जीचा सर्वात मोठा स्रोत निर्माण होऊ शकतो. यातून कुठल्याही प्रकारचे रेडिएशन आणि वेस्टेज निघत नाही.
6 / 9
हेलियम-3, पृथ्वीवरील सर्वात महागड्या गोष्टींपैकी एक आहे. एक किलो हेलियम-3 ची किंमत अंदाजे 1.5 मिलियन डॉलर पर्यंत जाते.
7 / 9
वैज्ञानिकांच्या मते चंद्रावर 1.1 मिलियन टनच्या जवळपास हेलियम-3 असू शकते. ज्यात पुढील 10 हजार वर्षांपर्यंत संपूर्ण जगाला आवश्यक असलेल्या उर्जेची गरज पूर्ण करण्याची क्षमता आहे.
8 / 9
महत्वाचे म्हणजे, भारताने चंद्राच्या ज्या साउथ पोलवर आपले यान पाठवले आहे, त्या भागात सर्वाधिक हेलियम-3 असण्याचा अंदाज आहे.
9 / 9
खरे तर, चंद्रावरून हेलियम-3 साठी खाणकाम करून ते पृथ्वीवर आणणे, हे मोठे आव्हान आहे. मात्र, वैज्ञानिकांच्या मते, येणाऱ्या काळात आर्टिफिशल इंटॅलिजन्स आणि रोबोटिक्सच्या सहाय्याने हे स्वप्न साकार होऊ शकते.
टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3Indiaभारतchinaचीनelectricityवीज